पनवेल : पिण्याचे पाणी दिवसातून काहीच मिनिटे मिळत असल्याने पिण्याचे पाणी करंजाडे वसाहतीला कधी मिळणार याचा जाब विचारण्यासाठी करंजाडेवासीयांनी मंगळवारी सकाळी बेलापूर येथील सिडको भवनावर धडक दिली. संतापलेल्या महिलांनी हातामध्ये रिकाम्या घागरी आणि सिडको मंडळाविरोधात निषेधाचे फलक घेऊन महिला आणि जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सकाळी साडेअकरा वाजता धडकले. मोर्चेकरांना सिडको भवनाशेजारी अर्बनहार्ट येथील मोकळ्या जागेत थांबविण्यात आले.

हेही वाचा : देशी सफरचंदही महागच मिळणार

करंजाडेवासीय पिण्याचे पाणी नियमीत कधी देणार, या प्रश्नासाठी सिडको भवनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. मोर्चेकरांचे एक शिष्टमंडळ सिडकोच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची दुपारी सिडको भवनात जाऊन भेट घेतील. सिडको मंडळातील अधिकारी पिण्याचे पाणी नियमीत कसे मिळेल याबाबत सिडको मंडळ कोणते नियोजन करणार याची माहिती मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाला देणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.