उरण : येथील खोपटा खाडीपूल हा वाहनांच्या वाहतुकीसाठी असताना या पुलावर अवजड कंटनेर वाहने उभी करण्यात आली आहेत. यामुळे पुलावरून खोपटाकडे जाणाऱ्या पुलाची एक मार्गिका व्यापल्याने ऐन गणेशोत्सवात नागरिकांना पुलावरील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. खोपटे पुलावर वारंवार अशा प्रकारची पार्किंग केली जात असल्याने पूल वाहतुकीसाठी आहे की पार्किंगसाठी? असा सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित होत आहे. नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उरणमधील पूर्व व पश्चिम या दोन्ही विभागांना जोडणाऱ्या खोपटा खाडी पुलावरून २३ वर्षांपासून वाहतूक सुरू झाली आहे.

हेही वाचा : उरणच्या रस्त्यांनंतर आता कचरा माफियांचे जंगल परिसरात अतिक्रमण; हिरवागार निसर्ग परिसर बनतोय डम्पिंग ग्राउंड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामुळे मुंबई, गोवा, अलिबाग यांना जोडणारा हा महत्वाचा पूल ठरला आहे. तसेच पनवेल मार्गे अधिक अंतराचा व इंधन बचतीचा प्रवास होऊ लागला आहे. तसेच या पुलामुळेच उरणच्या पूर्व विभागात जेएनपीटी बंदरावर आधारित उद्योग उभे राहू लागले आहेत. त्याचा लाभ या परिसरातील नागरिकांना झाला आहे. यातून रोजगार व व्यवसायात ही वाढ झाली आहे. या वाढत्या उद्योगामुळे जुना खोपटा पूल कमी पडू लागला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याच पुला शेजारी आणखी एक नवा पूल उभारला आहे. यातील एक पूल येणाऱ्या व दुसरा जाणाऱ्या वाहनांसाठी वापरला जात आहे. यातील खोपटा विभागात जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या नव्या पुलावर ही अवजड वाहने उभी केली जात आहेत.