पनवेल : खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील अक्षर इमारतीला आग लागली आहे. सव्वा पाच वाजता ही घटना घडली. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
हेही वाचा : उरणमध्ये भातपिकांची कापणी मळणी एकाचवेळी
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
आगीचे लोट परिसरात पसरु लागल्याने इमारतीजवळ रहिवाशांची गर्दी होऊ लागली. अक्षर इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर डी विंगमध्ये आग लागली. घटनास्थळी ३ अग्निशमन बंबच्या गाड्या पोहचल्या आहेत. पोलीस सुद्धा घटनास्थळी तैनात आहेत.