उरण : देशात इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात येणार, देश बदलणार, सत्ता बदलणार असे मत व्यक्त करीत सध्याच्या केंद्र सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. सत्ता बदल हा महाराष्ट्रातून होणार आहे. ज्या ठिकाणी महिलांचा सहभाग तिथे विश्वास आणि विजय हा निश्चितच असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ उरणच्या नगरपरिषद शाळेच्या प्रांगणात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री अनंत गीते, जितेंद्र आव्हाड, आ. जयंत पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, बाळाराम पाटील आदींसह प्रमुख नेते उपस्थित होते.

हेही वाचा : नवी मुंबई: घाऊक बाजारात नवीन ज्वारी दाखल; दर प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांवर

भाजपा खोटे बोलणारा पक्ष असून त्यांचा उद्देश केवळ सत्तामेव जयते आहे. मात्र या निवडणुकीत या विरोधात आपण सत्यमेव जयते अर्थात सत्याची बाजू घेणारे लढणार आणि जिंकणारच असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी उरणच्या प्रचार सभेत बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा : खारघरमध्ये छळवणूकीतून महिलेची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सभेत जितेंद्र आव्हाड यांनी मोदीवर टीका करीत ते आता विकासावर बोलत नाहीत, त्यांनी हिंदू-मुस्लीम सुरू केले असून सरकार भ्रष्टाचाराला कायदेशीर मान्यता देत असल्याचे मत व्यक्त केले. या सभेला शिवसेना (ठाकरे) काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.