उरण : जेएनपीए बंदरातील डिझेलवर चालणाऱ्या हजारो वाहनांचे विद्युत वाहनात रूपांतर करण्यात येणार आहे. गुरुवारी केंद्रीय बंदर व जहाज मंत्री सरबानंद सोनेवाल यांच्या हस्ते या वाहनांची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीए प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याची सुरुवात केंद्रीय मंत्री सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ उपस्थित राहणार आहेत. या वाहनांची सुरुवात गेल्यावर्षी स्वातंत्र्य दिना पासून जेएनपीए प्रशासनाने केली होती. विद्युत वाहनांमुळे बंदराची वाटचाल ही देशातील हरित बंदराकडे वाटचाल सुरु झाली आहे.

बंदर व्यवस्थापनाने ४०० पेक्षा अधिक वाहने इलेक्ट्रिक-ऑपरेटेड इंटर-टर्मिनल वाहनात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बंदर परिसरातील कार्बन वायूची मात्रा कमी करून हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने आपल्या शून्य उत्सर्जन ट्रकिंग उपक्रमाच्या घोषणेसह दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले.

शून्य उत्सर्जन ट्रकिंगवर आयोजित गोलमेज संमेलनात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि त्याच्या हाताळणी आणि आसपासच्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी बंदर परिसरात, ट्रकच्या हालचालींना डिकार्बोनाइझ करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखून जेएनपीएने आपल्या ट्रकच्या ताफ्याचे डिझेलवरून विद्युत उर्जेवर बदल करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.

सध्या बंदरात चालणारे बहुतेक ट्रक डिझेलवर चालतात, जे उत्सर्जन करीत आहेत. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांच्या आत जहाज आणि यार्ड ऑपरेशन्ससाठी टर्मिनल्समध्ये फिरणाऱ्या ४०० पेक्षा अधिक डिझेल चालित वाहनाचे रूपांतर विद्युत वाहनात केले जाणार आहे. बंदराचे हिरवेगार भविष्य शोधण्यासाठी एक धोरण अत्यावश्यक आहे. त्यासाठी बंदर परिसरात चार्जिंग स्टेशनसाठी आवश्यक आधारभूत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली आहे. पर्यावरणाचाही विचार करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जेएनपीए हे भारतातील पाहिले जमीन धारक बंदर झाले आहे.

तसेच स्पेशल इकॉनॉममक झोन (एस.इ.झेड.) निर्माण केले आहे. तर येत्या काळात भारतातील कृषी आयात-निर्यातीला चालना देणारे त्याचप्रमाणे देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराच्या उभारणीतून विविध उपक्रम राबविण्या येत असल्याची माहिती त्यांनी दिली.