कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात पथदिवे नसल्याने अंधारमय परिस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या वाहनतळावर मोठ्या प्रमाणावर वाहने पार्क केली जात असून याठिकाणी वीज नसल्याने नेहमीच काळोख असतो. त्यामुळे या काळोखाचा फायदा घेत या ठिकाणी हा परिसर मोठया प्रमाणावर मद्यपींचा अड्डा बनत चालला आहे. त्यामुळे या ठिकाणाहून रहदारी असणाऱ्या प्रवासी महिला वर्गांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थाकात सिडकोच्यावतीने एलईडी लाईट बसविण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकात अंधारात दिसत असल्याने जुने लाईट बदलून एलईडी लाईट बसविण्यात आलेले आहेत. मात्र आता रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरातील पथदिवे बंद असल्याने प्रवाशांना असुरक्षित वाटत आहे. रेल्वे स्थानक परिसरात अंधार असतो.

हेही वाचा: नवी मुंबई : मटणाच्या रस्यावरून झालेल्या वादात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोपरखैरणे रेल्वे स्थानक आजूबाजूला टपोरी मुले असतात. पार्किंगच्या जागेत काळोख असल्याने या ठिकाणी मद्यपींचा अड्डा बनत चालला आहे. त्यामुळे येथून जाताना महिलांना अंधारातून वाट काढावी लागते तर अंधारातून जाताना त्या असुरक्षित असून अंधाराचा फायदा घेत चोरी लूटमारीच्या घटना घडल्या तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.