महापे गावात मागील काही महिन्यांपासून अनियमित, तसेच कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही पाण्याचा अनियमित पुरवठा सुरूच आहे. त्यामुळे अखेर संतप्त रहिवाशांनी शुक्रवारी एमआयडीसीच्या अभियंत्यांना घेराव घालून पाण्याची समस्या सोडवण्यासाठी धारेवर धरले.

महापे गावात पाणी कमी दाबाने येत असल्याने ग्रामस्थांना पाण्याची टंचाई नेहमीच जाणवत असते. गेल्या वर्षभरापासून पाण्याची समस्या अधिक तीव्र होत चालली आहे. पूर्वी सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत गावात पाणी सोडले जायचे. मात्र, आता एमआयडीसीकडून मिळणारे पाणी काही प्रमाणात कमी झाले आहे. गावाची लोकसंख्याही वाढली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करण्याचे प्रमाण वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र कमी प्रमाणात पाणी दिले जात आहे.

हेही वाचा – रायगड : विमला तलावात आढळले मृत मासे

हेही वाचा – नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालयात खांदे पालट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपुऱ्या पाण्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापे गावात सुरळीत पाणी पुरवठा करावा म्हणून मागील एक वर्षापासून ग्रामस्थ एमआयडीसी व नवी मुंबई महानगरपालिकेकडे पाठ पुरावा करत आहेत, परंतु त्यावर काही उपाययोजना होत नसल्याने अखेर संतप्त झालेल्या रहिवाशांनी शुक्रवारी एमआयडीसीच्या उपअभियंत्यांना धारेवर धरत जाब विचारला. यावेळी महापे गावातील पाणी पुरवठा लवकरच सुरळीत केला जाईल, असे आश्वासन महापे ग्रामस्थांना अभियंत्यांनी दिले, अशी माहिती माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांनी दिली.