पनवेल : खांदेश्वर वसाहतीमध्ये आणि कळंबोली गावामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी विजचोरी केल्यामुळे वीज महावितरण कंपनीने दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये विज चोरी केलेल्या व्यक्तींविरोधात गुन्हे नोंदविले आहेत. 

हेही वाचा…अवघ्या सहा मिनिटांत सोनाराला महिलांचा गंडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर ११ येथील मंगलमूर्ती टॉवरमधील एका वीज ग्राहकाने ७१,६९९ युनिट वीजेची चोरी केल्याचे वीज महावितरण कंपनीचे अभियंत्यांच्या तपासणीमध्ये आढळल्याने तब्बल १५ लाख २३ हजार ५१० रुपयांचे विजेचे देयक न भरल्याने खांदेश्वर पोलीस ठाण्यात वीज ग्राहकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तसेच कळंबोली गावातील एका वीज ग्राहकाने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून ते या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत ७,४२८ वीज युनीटची चोरी केल्याने वीज महावितरण कंपनीने या विज ग्राहकाविरोधात २ लाख ५५ हजार ३७० रुपयांची विज चोरी केल्यामुळे कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.