उरण : अनेक नैसर्गिक संकटांवर मात करीत चिरनेरमध्ये आंबा पीक घेतले जात असून याच जंगलात आग लागल्याने शेतकऱ्यांच्या शेकडो आंबा झाडांची राख झाली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या झाडांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

उरण तालुक्यातील वनसंपदाच्या रक्षणाकडे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे दुर्लक्ष यामुळे भूमाफियांनी डोंगर, माळरान परिसर पोखरण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. माती काढणे सोयीस्कर व्हावे, यासाठी जंगल परिसरात आगी लावण्यास सुरुवात केली आहे. अशाच प्रकारची आग चिरनेरच्या डोंगराला लागल्यामुळे आंब्याच्या फळांनी बहरलेली शेकडो झाडे जळाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा…उरण : कोप्रोली आरोग्य केंद्रात रुग्णांची परवड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उरण तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. अशा वाढत्या औद्याोगिकीकरणामुळे आणि वन विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील भूमाफियांचा धंदा तेजीत आहे. तालुक्यातील उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. काही व्यावसायिकांनी डोंगर, माळरान परिसराला आगी लावण्यास सुरुवात केली आहे. डोंगरांना आगी लागण्याच्या घटनांमुळे डोंगरात वावरणाऱ्या पशुपक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.