नवी मुंबई : मराठा आरक्षण मागणी साठी मागील चार दिवसांपासुन आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन लांबण्याची शक्यता आहे. आंदोलकांनी सोबत आणलेले खाद्य पदार्थ संपत आल्याने राज्यातील गाव खेड्यातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. आज पहाटे पासून शेकडो गाड्यातून वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रात ही रसद उतरविण्याचे काम सुरु आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विविध खाद्य पदार्थ आणि अन्न धान्य डाळी आले आहेत की काही दिवस सहज पुरेल….

मराठा आरक्षण मागणी साठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे पाटील हे उपोषणस बसले असून आज पासून पाणी वर्ज्य करणार आहेत. सुरवातीला एक दोन दिवसात आंदोलन संपेल असा अंदाज असल्याने तेवढीच शिदोरी आंदोलकांनी सोबत आणली होती. ती संपली असल्याचे कळल्या नंतर राज्यातील विशेषतः बीड, धाराशिव, जालना जिल्ह्यातील गाव खेड्यातून करण्यात आलीली मदत आज पहाटे पासून सिडको प्रदर्शनी केंद्रात पोहचत आहे.

यात डाळी, कडधान्य, लोणचे विविध चटणी सोबतच गहू ज्वारी बाजरीचे पीठ, खाद्य तेल आदींचा समावेश आहे. या शिवाय लाखो चपाती ज्वारी बाजरीच्या भाकरी, बटाटा वांगी भाजी आदी तयार पदार्थ पोहचले आहेत आणि अजूनही येणार आहेत. अशी माहिती उपस्थित मराठा बांधव सत्यजित जाधव याने दिली. तयार पदार्थ दोन तीन दिवस पुरतील तर कडधान्य तयार पीठ असे आठ दिवस पुरतील तर विविध भाज्या टमाटे लसूण असे भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य भाजी मार्केट मधून कोणी ना कोणी हक्काने पाठवतेच.

या आंदोलनास लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत धडकले आहेत.. त्यांची राहण्याची सोय नवी मुंबईतील सिडको प्रदर्शनी केंद्र, कांदा बटाटा मार्केट आणि फळ मार्केट मध्ये करण्यात आली आहे. दिवसभर आंदोलक गणपतीचे दिवस असल्याने हे आंदोलन जास्त दिवस चालणार नाही असा अंदाज होता. मात्र चर्चेचे गुऱ्हाळ थांबत नसल्याने आंदोलन लांबत आहे. आता रसद आल्याने आम्ही बिनाघोर झाल्याची प्रतिक्रिया उमेश पाटील या मराठा बांधवाने दिली.

दिनक्रम ठरलेला आहे…

मुंबईत जागा मिळेल तिथे पाथाऱी पासरून राहू असा संकल्प करून आंदोलक आले आहेत मात्र सततच पाऊस आणि मुंबईतील अडचणी लक्षात घेता नवी मुंबईत त्यांनी मुक्काम ठोकळा आहे. सिडको प्रदर्शनी केंद्रात किमान वीस हजार आंदोलक राहत आहेत. सकाळी उठून ऐहिक उरकल्या नंतर जेवण बनवणे, जेवणे, दुपारचे सोबत घेऊन मुंबईतील आंदोलन स्थळ गाठाणे आणि रात्री परत मुक्कामास नवी मुंबईत येणे असा दिनक्रम आंदोलकांचा सुरु आहे.

याबाबत समन्वयक विनोद पोखरकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की आलेली सर्व मदत गाव खेड्यातून आली आहे. ही सर्व मदत अति सामान्य शेतकरी बांधवांनी सहकार्यतून दिलेली आहे