नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात सार्वजनिक स्वच्छतेबाबत पालिका अतिशय काटोकोरपणे लक्ष देत असून स्वच्छतेबाबत कोणतीही हलगर्जी होणार नाही याबाबत अधिकारी व स्वच्छता निरीक्षक कटाक्षाने काळजी घेत आहे. स्वच्छतेबाबत नवी मुंबई शहराचा देशात ३ रा क्रंमाक आहे. शहरात विविध विभागांत नागरीकांच्या सुविधेसाठी सार्वजनिक शौचालये आहेत, परंतु शौचालयातील पाण्याचा वापर खाजगी रुग्णवाहिका धुण्यासाठी केला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, पालिकेने याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

नवी मुंबई शहरात अनेक सार्वजनिक शौचालये आहेत. दिघा ते बेलापूर या परिसरात असलेल्या शौचालयांच्या स्वच्छतेची जबाबदारी विविध संस्थाना देण्यात आली आहे. शहरातील विविध शौचालयाच्या स्वच्छतेसाठी ठेकेदारांची नेमणूक केलेली आहे. ज्या ठेकेदारांना ही शौचालये देखभालीसाठी देण्यात आलेली आहेत. त्यांच्यामार्फत शौचालयांची स्वच्छता ठेवली जाते. तसेच या शौचालयांच्या देखभालीसाठी त्यांच्यावर विभागस्तरावर उपस्वच्छता निरीक्षक यांच्या नेमणूका केलेल्या आहेत. या सार्वजनिक शौचालयांच्या पाण्याचा योग्य व जपून वापर करण्याची आवश्यकता आहे. वाशी सेक्टर १० येथे महापालिका सार्वजनिक रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या शौचालयाच्या बाहेरील बाजूस रुग्णवाहिका लागलेल्या असतात. या रुग्णावाहिका धुण्यासाठी सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे याबाबत पालिकेने व संबंधित शौचालयाची देखभाल करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराने योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नवी मुंबई महापालिकेच्यावतीने परिमंडळ स्तरावर योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा – नवी मुंबईतील शिक्षित भागातही वीज चोरी

हेही वाचा – नवी मुंबई शहराचे आकर्षण असलेले वंडर्स पार्क फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरु होणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक शौछालयातील पाण्याचा गाड्या धुण्याबाबत वापर करण्यात येत असेल तर त्याबाबत संबंधित सार्वजनिक शौचालयाची देखभाल करणाऱ्या ठेकेदाराला जाब विचारण्यात येईल, असे परिमंडळ एकचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार म्हणाले.