नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आतापर्यंत आपण बारमध्ये अनधिकृत बांधकाम, अनधिकृत जागेवर बार अशा बातम्या पाहिल्या असतील. मात्र नवी मुंबईतील तुर्भे विभागात चक्क सार्वजनिक शौचालयाचे बारमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. एपीएमसी ट्रक टर्मिनल जवळ येणाऱ्या नागरिकांसाठी हे शौचालय बांधण्यात आले होते. मात्र बार व्यावसायिकाने या शौचालयाच्या आतमध्ये थेट बारची निर्मिती केली आहे. “नवी मुंबईतील बार व्यावसायिकांना ना पोलिसांची भीती आहे, ना प्रशासनाची. त्यामुळेच ‘हम करे सो कायदा’ याप्रमाणे बारव्यावसायिक वागताना पहायला मिळत आहेत.”, अशी टीका मनसेने केली आहे. मनसेचे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे यांनी या बारचा पर्दाफास करत असताना सिडकोकडे याची तक्रार करणार असल्याचे सांगितले.

हे वाचा >> “तर संजय राऊत यांची राज्यसभेची खासदारकी रद्द करावी..”, दीपक केसरकर शिवसेनेच्या कार्यकारिणीत प्रस्ताव आणणार

Robin Hood thief from Bihar
फक्त स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने करायचा घरफोडी; बिहारच्या ‘रॉबिन हूड’ला केरळमध्ये केलेली चोरी पडली महागात
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’
License refused for lack of parking facility The High Court said there is no such rule
पार्किंगची सोय नाही म्हणून परवाना नाकारला, उच्च न्यायालय म्हणाले, असा काही नियम नाही…

तुर्भेच्या सेक्टर १९ मध्ये सैराट बार सुरु असल्याचा पर्दाफाश विनोद पार्टे यांनी केला. शौचालयचे बारमध्ये रुंपातर करण्यात आल्याचे समजताच त्यांनी वॉर्ड अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करुन याची माहिती काढली. तसेच मनपा अधिकाऱ्यांना या बारमध्ये आणून सदर प्रकार दाखवून देण्यात आला. मात्र मनपाने हे शौचालय सिडकोचे असल्याचे सांगत त्यांच्याकडे बोट दाखविले. तसेच मनपाने सिडकोला अतिक्रमणाबाबतचे एक पत्रही दिले. मनसेच्या माध्यमातून आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत, अशी प्रतिक्रिया पार्टे यांनी दिली. भविष्यात शौचालयाच्या सर्विस बार तयार व्हायला लागले, तर ही राज्यासाठी शरमेची बाब असेल. या शौचालयाला सैराट बार बनविणाऱ्यांना समोर आणल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

हे वाचा >> CCTV Video: तीन भटके कुत्रे, चार वर्षांचा लहान मुलगा; भररस्त्यात कुत्र्यांनी लचके तोडल्यानंतर मुलाचा दुर्दैवी मृत्यू

मनेसेचे नेते विनोद पार्टे यांनी या शौचालयावर धाड टाकून ही धक्कादायक बाब उजेडात आणली. शहरात शौचालयाचे बार होत असतील तर पोलीस प्रशासन आणि संबंधित शासकीय यंत्रणा काय करते? असा प्रश्न सध्या नवी मुंबईकरांना सतावत आहे. प्रत्यक्षात हे सिडकोचे शौचालय असून अद्याप एपीएमसी प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आलेले नाही. यात मनपाच्याच एका अधिकाऱ्याचा हस्तक्षेप असल्याचा आरोप करत यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे.