पनवेल : १८ वर्षांच्या पिडीत विद्यार्थीनीला तीच्याच वर्गातील विद्यार्थ्याने केलेल्या विनयभंगामुळे संबंधित विद्यार्थ्यावर कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पिडीत विद्यार्थी आणि संशयीत आरोपी विद्यार्थी हे दोघेही मूळ राहणारे मुंब्रा कौंसा येथील आहे. ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पनवेल येथील महाविद्यालयात दररोज येत असंत. पिडीत विद्यार्थीनीने दिलेल्या तक्रारीनूसार संबंधित विद्यार्थी हा तीचा पाठलाग करत होता. तीच्याशी वारंवार बोलण्याचा त्याचे नेहमी प्रयत्न सूरु असायचे. तो पिडीतेच्या चेह-यावर डोक्यावर आणि पाठीवर मारत असे.

हेही वाचा >>> ‘भावी पिढीसाठी निसर्ग जपून ठेवण्याची गरज’; विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थीनीला अपमानीत झाल्याचे नेहमी वाटत असल्याने तीने विनयभंग केल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात दिली आहे. एवढ्यावरच हा विद्यार्थी थांबला नाही. त्याने तीच्या छायाचित्राच्या साह्याने तीचे इन्स्टाग्रामवर बनावट खाते सूरु केले. पिडीतेच्या पालकांना संबंधित पिडीता आणि त्याच्यात संबंध असल्याचे खोटे सांगीतल्याने अखेर वैतागून विद्यार्थीनी पोलीसांकडे गेली.