उरण : मोरा ते मुंबई तसेच रेवस (अलिबाग) ते करंजा (उरण) दरम्यान रो रो सेवेसाठी जेट्टी उभारण्याचे काम २०१८ सालापासून रखडले आहे. त्यामुळे या दोन्ही जलमार्गाच्या कामाच्या खर्चात वाढ झाली आहे. यातील रेवस जेट्टी कामाचा २५ कोटींचा खर्च ३० कोटींवर तर मोरो जेट्टीचा ५० कोटींच्या कामाचा खर्च ७५ कोटींवर पोहोचला आहे.

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून या दोन्ही जेट्टीचे काम करण्यात येत आहे. यातील करंजा बंदरावरील जेट्टीचे काम पूर्ण होऊन पाच वर्षे झाली आहेत. यातील जेट्टीची दुरवस्था होऊ लागली आहे. मात्र या जलमार्गावरील रेवस जेट्टीचे काम अनेक कारणांनी रखडले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी नव्याने निविदा मागविण्या आल्या आहेत. त्यामुळे या जेट्टीचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. तर मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का या रो रो मार्गावरील भाऊचा धक्का ही जेट्टी कार्यान्वित झाली आहे. मात्र मोरा जेट्टीचे काम चार वर्षांपासून रखडले आहे. हे काम रखल्याने ५० कोटींच्या कामाची रक्कम ७५ कोटींवर पोहचली आहे. तरीही जेट्टीचे काम अपूर्णच असून जेट्टी पर्यंत जाण्यासाठी मार्ग ही होऊ शकलेला नाही.

आणखी वाचा-सिडको महागृहनिर्माण योजना अर्जातील दोन अटी शिथिल

उरण हा समुद्र आणि खाडी मार्गाने मुंबई आणि अलिबाग यांना जोडता यावा यासाठी स्वातंत्र्य पूर्व काळापासून जलसेवा सुरू आहे. मात्र या मार्गाने वाहन घेऊन प्रवास करता यावा याकरीता रो रो सेवा सुरू करण्याचा मानस आहे. हे काम वारंवार बंद होऊन रखडले आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होणार का असा सवाल आता या मार्गावरील प्रवासी करू लागले आहेत.

जलमार्ग केव्हा?

मोरा – मुंबई व अलिबाग आणि उरणला जोडणाऱ्या रेवस ते करंजा मार्गावरील रो रो सेवा खरचं सुरू होणार का अशी शंका व्यक्त केली जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उरणला मुंबईशी जोडणाऱ्या अटल सेतूमुळे मुंबईत वाहन घेऊन जाणारे या सेतूचा वापर करू लागले आहेत. तर रेवस करंजा या सागरी पुलाच्या कामाचीही निविदा जाहीर झाली आहे. त्यामुळे करंजा रेवस या जल मार्गावरील रो रो सेवा चालणार का, अशीही शंका आहे.

आणखी वाचा-शिलेदारांच्या गडातच संदीप नाईकांची पिछाडी, भाजपमध्ये मात्र गड राखले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करंजा ते रेवस रो रो ची नव्याने निविदा काढण्यात आली आहे. तर मोरा जेट्टीचे काम लवकरच सुरू करण्यात येऊन मे अखेर पर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती मेरिटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली आहे.