लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : सिडको महामंडळाने ११ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या २६ हजार घरांच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या महागृहनिर्माण योजनेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून या योजनेतील नवीन अर्ज करणाऱ्यांना यापुढे बारकोड असलेले प्रमाणपत्र सादर करण्याची अट आणि स्टॅम्प पेपरवरची अट सिडकोने शिथिल केली आहे. नवीन अर्ज भरणाऱ्यांना कोऱ्या कागदावर स्वसाक्षांकित शपथपत्र / वचनपत्र सादर करता येणार आहे. अर्ज भरायला ४५ दिवसांपूर्वी सुरुवात झाली. मात्र सामान्यांच्या मागणीचा विचार करून सिडको मंडळाच्या अधिका-यांनी मंगळवारी हा निर्णय जाहीर केला. बारकोड नसलेले रहिवास प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा सिडकोने दिली असली तरी वाटपपत्र देण्यापूर्वी बारकोड असलेले रहिवास प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे.

Mumbai , constructions, MHADA , projects, Notices ,
मुंबई : उल्लंघन करणाऱ्या ४७७ बांधकामांना नोटीस, ३३ प्रकल्पांना काम थांबविण्याचे म्हाडाचे आदेश
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Pimpri, entrepreneur , LBT ,
पिंपरी : उद्योजकांमागे ‘एलबीटी’चे शुक्लकाष्ट, महापालिकेकडून ७२ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा
Employee Stress , App , Pune Municipal corporation ,
कर्मचाऱ्यांच्या ताणावर ॲपची मात्रा ! पुणे महापालिका प्रशासनाचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव
Regional office of Agriculture and Processed Food Products Export Development Authority APEDA opened in Nagpur Mumbai print news
नागपुरात होणार ‘अपेडा’चे प्रादेशिक कार्यालय; जाणून घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसा पुढाकार घेतला
Athavale claim chairman of trust running Siddharth college
‘पीपल्स’च्या अध्यक्षपदावर रामदास आठवले यांचा दावा; जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ५०० कोटींच्या निधीची मागणी
Maharera , Registration , New Housing Project,
स्वयंविनियामक संस्थेतील प्रतिनिधींची आता दोन वर्षांसाठीच नियुक्ती, दोन वर्षांनंतर प्रतिनिधी बदलावे लागणार
survey licenses for qualified hawkers are stalled
पिंपरी : डिजिटल स्वाक्षरीअभावी दोन वर्षांपासून परवान्यांंचे वितरण रखडले

सिडको महामंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ ही महागृहनिर्माण योजनेची सोडत प्रक्रियेला सुरुवात केली. या योजनेमध्ये तळोजात सर्वाधिक १३ हजार घरे आहेत तर उर्वरित घरे खारघर, वाशी, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल, बामनडोंगरी, खारकोपर, कळंबोली अशा विविध नोडमध्ये आहेत. ११ डिसेंबरपर्यंत या योजनेसाठी नागरिक ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटामधील नागरिकांना ही घरे मिळणार आहेत. अर्जदारांना त्यांच्या पसंतीचे घर निवडण्याचे स्वातंत्र्य या योजनेत असणार आहे. अर्जदारांना ऑनलाइन अर्ज करताना ओळखपत्राच्या कागदपत्रांसोबत उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र इ. आवश्यक कागदपत्रांची पुर्तता घर सोडतीमध्ये लागण्यापूर्वी करावी लागत आहे.

आणखी वाचा-शिलेदारांच्या गडातच संदीप नाईकांची पिछाडी, भाजपमध्ये मात्र गड राखले

यापूर्वी ऑनलाइन अर्ज नोंदणी करताना बारकोड असलेले प्रमाणपत्र सादर करण्याची अट सिडकोने ठेवली होती. सिडकोच्या अधिका-यांनी ही अट शिथिल केली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी करताना बारकोड नसलेले रहिवास प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु वाटपपत्र देण्यापूर्वी बारकोड असलेले रहिवास प्रमाणपत्र सादर करणे अर्जदारांना अनिवार्य असणार आहे. तसेच १०० रुपये किंवा ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपरवर शपथपत्र / वचनपत्र सादर करण्याची अट सिडकोने यापूर्वी अर्जदाराना घातली होती ही अट सुद्धा सिडकोने मंगळवारी शिथिल केल्याने अर्जदारांना कोऱ्या कागदावर स्वसाक्षांकित शपथपत्र / वचनपत्र सादर करता येणार आहे. अजूनही घरांचे दर न समजल्याने या योजनेतील अर्जदार संभ्रमात आहेत. घरांचे दर न परवडणारे असल्यास अर्जभरण्यासाठी केलेली अल्प उत्पन्न गटातील नागरिकांची धडपड वाया जाईल असे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे.

आणखी वाचा-महेश बालदी यांनी पुन्हा जिंकले उरणच रण, मात्र नवख्या प्रीतम म्हात्रे यांचीही निकराची झुंज

या गृहनिर्माण योजनेद्वारे नवी मुंबईसारख्या सोयी सुविधांनी सुसज्ज शहरामध्ये घराचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी नागरिकांना लाभली आहे. अधिकाधिक नागरिकांनी आपले घराचे स्वप्न साकार करण्यासाठी योजनेकरिता अर्ज करावा. -प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको

Story img Loader