नवीन पनवेल वसाहतीमध्ये रेल्वेस्थानकाजवळील रिक्षा थांब्याच्या परिसरात एका प्रवासी महिलेचा चाकू भोसकून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजता घडली. मृत महिलेचे नाव प्रियंका रावत असे आहे. २९ वर्षीय प्रियंका या कामावरुन घरी जात असताना ही घटना घडली. प्रियंका या विहीघर येथील महालक्ष्मी सोसायटीत राहत होत्या. खांदेश्वर पोलीस ठाण्यात या घटनेनंतर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे व पोलिस पथक खून्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे प्रवासी महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : घरा बाहेर जाताय…गाडी कुठे पार्क करणार? घरघर चालते डोक्यात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियंका या ठाणे येथील डीजीटल मार्केटींग कंपनीत काम करणा-या आहेत. त्या दररोज याच वेळेत रेल्वे प्रवास करुन घरी परतत असतं. प्रियंका या विवाहित असून त्यांच्या खून्याच्या मागावर पोलीस पथक असून लवकरच मारेक-यांना पकडू अशी माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी दिली