नवी मुंबई: भ्रष्टचार खूप वाढला आहे असे म्हणून विषय सोडून देण्या ऐवजी त्याला आळा घालण्यासाठी जेव्हा जेव्हा लाच देण्याची वेळ येतील तेव्हा तेव्हा लाच लुचपत विभागाची मदत घेणे आवश्यक आहे. भ्रष्टाचार निर्मूलन साठी सर्वांची साथ हवी आहे. हाच उद्देश्य ठेवत लाच लुचपत विभागाने “दक्षता जनजागृती सप्ताह २०२५” चे आयोजन केले आहे. हा सप्ताह २७ ऑक्टोबर तें २ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
भ्रष्टचार संपवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र अनेकदा याबाबत माहिती नसल्याने लाच कोणी मागणीतली तर नेमके काय करावे कुठे जावे काय अडचणी येतात याबाबत माहिती नसल्याने कोणी पुढे येत नाही परिणामी भ्रष्टचार अजून बोकाळतो. त्यामुळे दरवर्षी भ्रष्टाचार विरोधी जनजागृती लाचलुचपत विभाग करते. या वर्षीही सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहात जास्तीत जास्त लोकांना भेटून बोलून त्यांना सहभागी केले जात आहे. यासाठी पथनाट्य , पत्रके वाटप , महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांत जनजाग्रुती करणे, एनएसएसच्या विद्यार्थींना माहिती देत त्यांच्या द्वारे जनजाग्रुती केली जात आहे. या शिवाय पनवेल नवी मुंबई उरण भागातील , सर्व सरकारी निमसरकारी कार्यालयात जाऊन भ्रष्टचार करणार नसल्याची शपत दिली जात आहे. तसेच समाज माध्यमांचा वापर हि केला जात आहे.
२९ तारखेला एसआयईएस कॉलेज, नेरूळ, नवी मुंबई येथील ६० ते ७० विदयार्थी यांचेशी संवाद साधण्यात आला. भ्रष्टाचारा विरूध्द जनजागृती करण्याकरीता, रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवारी भाऊराव पाटील महाविदयालयाच्या विदयार्थ्यांनी पनवेल एस.टी. डेपो व सीबीडी रेल्वे स्टेशन, नवी मुंबई येथे पथनाट्य सादर केले. या ठिकाणी उपस्थित लोकांना अॅन्टी करप्शन ब्युरो, नवी मुंबई कार्यालयाचा पत्ता व दुरध्वनी क्रमांक, टोल फ्री क्रमांक नमूद असलेले माहिती पत्रके (पोम्प्लेट) वाटण्यात आली.
दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने ऐरोली नाका ब्रिज जवळ, बेलापुर-ठाणे महामार्ग सिग्नल जवळ, तुर्भे नाका सिग्नल, ऑरेंजा सिग्नल, सानपाडा सिग्नल, नवी मुंबई महानगरपालिका प्रवेशद्वार, सिडको कार्यालय प्रवेश द्वार, कामोठे उड्डाणपुल, पनवेल एस. टी. डेपो, सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल या शासकिय कार्यालयाचे प्रवेश द्वाराचे दर्शनीय ठिकाणी दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ चे फ्लेक्स (Flex) लावण्यात आले.
पोलीस निरीक्षक, किरणकुमार वाघ व कर्मचारी यांनी पंचायत समिती कार्यालय, पनवेल , जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पनवेल, तालुका आरोग्य अधिकारी, पनवेल, पाणी पुरवठा विभाग, पनवेल एस.टी. डेपो , दुय्यम निबंधक कार्यालय, महावितरण कार्यालय भिंगारी, या शासकीय कार्यालयाचे दर्शनीय ठिकाणी भित्तीपत्रके लावुन, माहिती पत्रके वाटून, नवी मुंबई शहरामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन संदेश पोहचवण्यात आला.
तसेच विविध लोकांशी संवाद साधून भ्रष्टाचार निर्मूलनाचा संदेश दिला. तसेच दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, अरूंधती येळवे व कर्मचारी यांनी नवी मुंबई महानगरपालिका, एच विभाग दिघा, अग्निशमन दल ऐरोली , ऐरोली बस स्थानक, ऐरोली रेल्वे स्थानक , नवी मुंबई महानगरपालिका ‘जी’ वॉर्ड कार्यालय, ऐरोली, नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पीटल, ऐरोली, घणसोली बसस्थानक इत्यादी शासकीय कार्यालयाचे दर्शनीय ठिकाणी भित्तीपत्रके लावुन, माहिती पत्रके वाटुन, नवी मुंबई शहरामध्ये भ्रष्टाचार निर्मुलनाचा संदेश पोहचवला.
