नवी मुंबईत मागच्या महिन्यात एसी बसच्या मागच्या सीटवर शरीरसंबंध ठेवणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओतल्या जोडप्याला पोलिसांनी शोधलं आहे. या जोडप्याला न्यायालयाने आता शिक्षा सुनावली आहे.
काय आहे ही घटना?
मागील महिन्याच्या २० तारखेला म्हणजेच २० एप्रिलला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओ नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या एसी बसमध्ये एक जोडपे मागच्या सीटवर शरीरसंबंध ठेवताना दिसलं होतं. ही घटना रविवारी २० एप्रिल रोजी संध्याकाळी नवी मुंबई मुनिसीपल ट्रान्सपोर्टच्या बसमध्ये घडली होती. ही एसी बस पनवेलवरून कल्याणच्या दिशेनं जात होती. रविवारचा दिवस असल्याने बसमध्ये गर्दी कमी होती. तसेच परिसरात ट्रॅफिक जास्त असल्याने बसचा स्पीडही स्लो झाला होता. अशात मागच्या सीटवर २० वय असणारं एक जोडपं बसलं होतं. कंडक्टर पुढे काही प्रवाशांसोबत बसले होते. अशात मागच्या सीटवर या कपलने थेट शारिरीक संबंध ठेवायला सुरुवात केली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या बाइकस्वाराने हा सगळा प्रकार पाहिला. त्याने आपल्या फोनमध्ये अश्लील कृत्य कैद केलं.
मागच्या महिन्यात व्हिडीओ झाला व्हायरल
रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांनी NMMT च्या बसमधला हा प्रकार शूट करुन व्हायरल केला होता. ज्यानंतर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. या जोडप्याचा शोध पोलीस घेत होते. त्यांना शोधण्यात पोलिसांना यश आलं असून पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केलं. स्थानिक न्यायालयाने या जोडप्याला बसमध्ये शरीरसंबंध ठेवल्याबद्दल २ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या जोडप्याने बसमध्ये सेक्स केल्याच्या कृत्याबाबत न्यायालयात पश्चात्ताप व्यक्त केला. ज्यानंतर २ हजार रुपयांचा दंड ठोठावत न्यायलयाने या दोघांची सुटका केली. या जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनने बस वाहकाला सतर्क न राहिल्याबद्दल आणि जोडप्याला बसमध्ये शरीरसंबंध ठेवण्यापासून रोखलं नसल्याबद्दल निलंबित केलं होतं. मात्र आता त्या वाहकाला पुन्हा सेवेत घेण्यात आलं आहे. सदर वहिडीओ एका बाईक स्वारने शूट केला होता. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
कामोठे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती तक्रार
याप्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाहतूक शाखेने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लीलतेबद्दल बीएनएसच्या कलम २९६ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ११० आणि ११७ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी जोडप्याला शोधलं. याप्रकरणी आता कोर्टानं जोडप्याला २००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.