शिवसेना उपनेते, पर्यावरण समाघात प्राधिकरण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजय नाहटा यांनी मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. शिवडी न्हावा – शेवा मुंबई ट्रान्स हार्बर क्रीक सी लिंक प्रकल्पामध्ये नवी मुंबतील बाधित मच्छिमारांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रकल्पग्रस्त मच्छीमार बांधवही उपस्थित होते. मुनगंटीवारांनीही मच्छिमारांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
हेही वाचा- मुंबईतील घाऊक बाजारात कोथींबीर जुडी ८०रुपयांना! पावसामुळे बाजारात ६०% पालेभाज्या खराब
मुनगंटीवारांचे अधिकाऱ्यांना आदेश
मरीआई मच्छीमार सहकारी संस्थेच्यावतीने शिवसेना उपनेते विजय नाहटा यांना दहा गावाच्या प्रकल्पबाधित मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून निवेदन देण्यात आले होते. अरबी समुद्रात सुरु असलेल्या शिवडी न्हावा – शेवा मुंबई ट्रान्स हार्बर क्रीक सी लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमार बांधवाना एमएमआरडीएकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून निवेदन देण्यात आले होते. या संदर्भात मच्छिमार बांधवांनी मंत्रालयात जाऊन मुनगंटीवारांची भेट घेतली आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. सुधीर मुनगंटीवार यांनी एमएमआरडीएचे प्रादेशिक उपयुक्त तसेच आयुक्त यांना प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना लवकर नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.