नवी मुंबई : राज्य शासनाच्या १५ मार्चच्या शिक्षकांच्या गणवेशाबाबतच्या परिपत्रकानुसार नवी मुंबईतही शिक्षकांचा गणवेश निश्चित करण्यासाठी ऑनलाइन लिंक पाठवून शिक्षकांच्या मतदानाचा कौल घेतला जाणार आहे. त्याची सुरुवात नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने केली असून ४६० शिक्षकांनी लिंकद्वारे गणवेशाबाबत मतदानाचा कौल दिला आहे.

शिक्षकांचा संबंध हा भावी पिढीशी येत असून त्यांच्या गणवेशाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना शिक्षकांनी वेशभूषेबाबत जागरूक राहून आपली वेशभूषा ही आपल्या पदास अनुरूप असावी असे पत्रकात म्हटले असून विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असल्याने शिक्षक व शिक्षिकांना गणवेशाबाबत योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षकांच्या गणवेशाची बाब विचारात घेता गणवेश कसा असावा त्याचा रंग कसा असावा याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा…उद्यानात कार्यकर्त्यांचा ‘श्रमपरिहार’! नवी मुंबई पोलीस तसेच महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

नवी मुंबई महापालिकेनेही आपल्या अखत्यारीत येणाऱ्या पालिकेच्या पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचा गणवेश निश्चित केल्याप्रमाणे त्याचा रंगनिश्चितीसाठी लिंकद्वारे मतदानाचा कौल घेतला जात आहे. त्यात महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता व दुपट्टा तर पुरुष शिक्षकांनी जीन्स, टी शर्ट न वापरता पॅन्ट-शर्ट असा पेहराव करावा तसेच चित्र-विचित्र नक्षीदार कपडे परिधान करून नयेत, असे शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटले आहे. शिक्षकांनी कोणत्या रंगाचा पेहराव करावा हे त्या शाळेने निश्चित करावे असे सांगितले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागाने महिला शिक्षकांसाठीची साडी व कुर्ती तसेच पुरुष शिक्षकांच्या शर्टचा रंग निश्चित करण्यासाठी मतदान घेण्यासाठी संबंधित शिक्षकांना लिंक पाठवली आहे. त्यानुसार लिंकद्वारे साडी किंवा कुर्ती आणि शर्ट यांचा रंग निश्चित झाल्यावर त्या आधारे स्त्री शिक्षकांसाठीचा ब्लाऊज व सलवार तसेच पुरुष शिक्षकांच्या पॅन्टचा रंग निश्चित करण्यासाठी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेतील सर्व शिक्षकांच्या मोबाइलवर फॉर्मची लिंक पाठवण्यात आली असून हा फॉर्म तात्काळ भरून देण्याचे आवाहन देण्यात आले आहे.

हेही वाचा…पनवेल: सरकारी पोस्ट कार्यालयाबाहेर छप्पर टाकण्यासाठी नागरिकांचा पुढाकार

१६५
पूर्वप्राथमिक शिक्षक

८५९

प्राथमिक शिक्षक

१९२

माध्यमिक शिक्षक

हेही वाचा…फ्लेमिंगो पक्ष्यांचा मार्गबदल का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दिलेल्या मार्च महिन्यातील परिपत्रकानुसार नवी मुंबई महापालिकेतील शिक्षकांच्या गणवेशाबाबत लिंकद्वारे मतदानाचा कौल घेण्यात येत असून याबाबत शिक्षकांना लिंक पाठवण्यात आली असून त्याद्वारे अंतिम रंगनिश्चिती करण्यात येणार आहे. सर्व शिक्षकांना लिंक पाठवण्यात आली असून आतापर्यंत ४६० शिक्षकांनी लिंक पाठवली आहे. – अरुणा यादव, शिक्षणाधिकारी, नवी मुंबई महापालिका