नवी मुंबई – दिवाळी १७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेतील कर्माचाऱ्यांना किती सानुग्रह अनुदान मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. नवी मुंबई महापालिका  आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जावी यादृष्टीने गेल्यावर्षी  सन २०२३ -२४ या वर्षाकरिता  महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांना ३३ हजार तसेच करार / तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना रू. २७ हजार आणि आशा वर्कर यांना रु.१७ हजार रक्कमेचे सानुग्रह अनुदान जाहीर केलेले होते.  त्यामुळे यंदा सानुग्रह अनुदान किती जाहीर होणार याची कर्माचाऱ्यांना उत्सुकता लागली आहे. पालिका आयुक्तांनी गेल्यावर्षी १० टक्के वाढ केली होती.त्यामुळे यंदाही १० टक्के वाढ केल्यास पालिका कर्माचाऱ्यांना ३५ ते ३६ हजारापर्यंत सानुग्रह अनुदान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नवी मुंबई  महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांना गेल्यावर्षी . ३३ हजार सानुग्रह अनुदान दिले होते. त्याचप्रमाणे ठोक मानधनावर, किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी – कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना  सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान केली होती. याशिवाय सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले व शासनाकडून मानधन प्राप्त होणा-या कंत्राटी कर्मचा-यांनाही करार पध्दतीवरील कर्मचा-यांप्रमाणे रू. २७ हजार इतके सानुग्रह अनुदान त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना रू.१७ हजार सानुग्रह अनुदान देण्यात आले होते.त्यामुळे यंदा दिवाळीनिमित्त किती सानुग्रह अनुदान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवी मुंबई महापालिकेत  ४६०० पेक्षा अधिक  अधिकारी, कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा प्रस्ताव  महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे लेखा व प्रशासन विभागामार्फत  मान्यतेसाठी पाठवण्यात आला  आहे. दिवाळी सणापूर्वीच सानुग्रह अनुदानाची रक्कम  अधिकारी, कर्मचारी यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते त्यामुळे  लवकरच नवी मुंबई महापालिकेतर्फे किती सानुग्रह अनुदान मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

दिवाळी सणाच्या अनुषंगाने महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना  सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.त्यामुळे लवकरच याबाबतचा निर्णय आयुक्तांकडून घेण्यात येईल .सत्यवान उबाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी ,नवी मुंबई महापालिका