नवी मुंबई : ठाण्याच्या नेत्यांना नवी मुंबईचे वाटोळे करू देणार नाहीत. हे शहर आमच्या नेत्यांनी जोपसले. असून त्याला उध्वस्त होऊ देणार नाही. असा इशारा भाजप माजी नगरसेवक सुरज पाटील, नेत्रा शिर्के, आणि अपर्णा गवते यांनी दिला आहे. शनिवारी ठाणे जिल्हा खासदार नरेंद्र म्हस्के आणि बेलापूर विधानसभा अध्यक्ष किशोर पाटकर यांनी पत्रकार परिषदेत गणेश नाईक यांच्यावर टीका केली होती. या टिकेला उत्तरंच या पत्रकार परिषद मध्ये देण्यात आले.

 मनपा निवडणूक जसं जशी जवळ येऊ लागली आहे तसें सत्ताधारी विरोधी पक्षात आरोप प्रत्यारोप फैरी झडत असतात मात्र नवी मुंबईत सत्ताधारी पक्षातील शिवसेना आणि भाजप या घटक पक्षातच जोरदार खडाजंगी होत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे जिल्हा खासदार नरेंद्र म्हस्के आणि बेलापूर विधानसभा शिवसेनेचे अध्यक्ष किशोर पाटकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत वन मंत्री  गणेश नाईक यांच्यावर टिकेची झोड उठवली होती. यात गम्भीर आरोप करत इशारे देण्यात आले. त्यामुळे नवी मुंबईत राजकीय वातावरण तापले होते. आपली बाजू मांडावी म्हणून भाजपच्या सुरज पाटील नेत्रा शिर्के आणि अपर्णा गवते यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेंद्र म्हस्के, आणि बेलापूर विधानसभा अध्यक्ष किशोर पाटकर यांचे नाव ण घेता प्रतिउत्तर दिले. यावेळी सुरज पाटील यांनी अतिशय गंभीर आरोप केले. 

कोविड काळात आमचा पळवलेला निधी,  याच काळात पाणी पळवले, आम्ही पाणी वापरात नसताना बारावी धरणग्रस्त लोकांना  मनपात नोकरीं दिल्या मात्र दहा दहा बारा बारा वर्ष कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्यांना येथील लोकांना न्याय दिला नाही. एमआयडीसी मध्ये सेवा रस्त्यांवर नाल्यावर भूखंड दिले. नियोजन बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आता हट्टा पायी चौदा गावे  घुसवले हे आम्ही विसरणार नाही… आज नवी मुंबईच्या तोडीचे एकही शहर आसपास नाही. मात्र या शहराविषयीं आस्था नसणारे शहर उध्वस्त करू पाहत आहेत. मात्र  आमचे शहर उध्वस्त करू देणार नाही..

आम्ही टीका केली म्हणून रडगाणे गाता… आमच्या नेत्याने कोणाचेही नाव घेतले नाही तुम्ही स्वतःवर ओढून का घेता असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्थानिक नेतृत्वाला विचारतो.माजी नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी कोणाचेही नाव न घेता शिवसेनेवर टीका करताना आमच्या शहरा विषयीं काहीही आत्मीयता नाही.. सिडकोने वसवलेल्या शहर आम्ही जोपसले मोठे केले. पूर्नविकासाला कधीच विरोध नाही नियोजन बद्ध हे काम व्हावे या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सध्या जो पुनर्विकास होत आहे तो सध्या जे जास्त बोलत आहेत त्यांचा होत आहे. व्हिजनरी नेत्यांच्या विषयी त्यांनी बोलू नये जनता दरबार हे तात्काळ जनतेचे प्रश्न सुटणारे व्यासपीठ असताना त्याच्या विरोधात न्यायालयात जातात. हे शहर विकासाला खिळ ठोकणारे प्रकार आहे. हे आरोप थांबवले नाही तर आम्हीही तुमचे धंदे उघड करू. असा इशारा शिवसेना बेलापूर विधानसभा अध्यक्ष किशोर पाटकर यांचे नाव न घेता केला.

माजी नगरसेविका अपर्णा गवते यांनीही शिवसेनेवर टिकास्त्र सोडले मलनिस्सण केंद्राची जमीन हडपली. यादव नगरला शाळेला चार भूखंड दिले. मात्र त्यातील दोन शाळेच्या पटांगण वर लॉजिंग उभे केले जात आहे. हे तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या काळात झाले आजही उद्योग मंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत. एमआयडीसी फुलवण्या ऐवजी उध्वस्त करण्याचे पाप आम्ही करू देणार नाही असेही गवते यांनी ठणकवले.

चौदा गावे कळीचा मुद्दा………

ठाणे तालुक्यातील अडवली-भूताली, दहिसर,  पिंपरी,  वालीवली,  भंडार्ली,  गोटेघर,  मोकाशी,  उत्तरशिव,  नागांव,  नावाळी,  निघु,  नारीवली,  बामाळी,  वाकळण, बाळे. ही गावे पूर्वी नवी मुंबई मनपा क्षेत्रात होती मात्र तेथील स्थानिकांचा याला कडाडून विरोध असल्याने मोर्चे आंदोलने झाली. त्यामुळे नवी मुंबई मनपातून ती वेगळण्यात आली. मात्र सुमारे दहा बारा वर्षांनी कुणाच्या हट्टाने या गावांचा समावेश पुन्हा नवी मुंबई मनपात करण्यात आला. अशी टीका सुरज पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. या गावांचा समावेश नवी मुंबईत केला मात्र या गावांच्या विकास निधी आम्ही का द्यायचा या साठी सहा हजार कोटी लागणार असल्याचे तत्कालीन आयुक्तानीं नगर विकास विभागाला कळवले होते. त्या बाबत कोणी चकार शब्द काढत नाहीत… असा आरोप ही पाटील यांनी केला.