नवी मुंबई : किल्ले गावठाण ते अ‍ॅरेंजा कॉर्नरपर्यंत पामबीच मार्गावर विविध ठिकाणी असलेले छोटे पुल व जंक्शनच्या ठिकाणाच्या रस्त्याची मायक्रोसर्फेसिंगद्वारे दुरुस्ती करण्यात येत असून या कामासाठी वस्तू व सेवा करासह १० कोटी खर्च केला जात असून पालिकेने पामबीच मार्गावरील सायन पनवेल महामार्गाखालील वाशी जवळील उड्डाणपुलाखालील कामाला मागील काही दिवसांपासून सुरुवात केली असून या ठिकाणी सुरु असलेल्या कामामुळे या भागात सातत्याने वाहतूकोंडीला सामोरे जावे लागत आहे.

पालिका या ठिकाणच्या काँक्रीटीकरणाच्या कामासाठी जवळजवळ २ कोटीपेक्षा अधिकचा खर्च करत आहे. नवी मुंबई महापालिकेच्यावतीने शहरातील विविध ठिकाणचे रस्ते काँक्रीटीकरण करण्यात येत असून करण्यात येत असून पामबीच मार्गावरील वाशी हायवे उड्डाणपुलाखालील मार्गही काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. परंतू या ठिकाणी दोन्ही बाजूला रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरु असून या कामाच्या ठिकाणी संबंधित पालिकेचा ठेकेदार तसेच वाहतूक पोलीस यांनी योग्य खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. सायन-पनवेल महामार्गावरून पामबीचवर येणारी वाहने तसेच वाशीहून बेलापूरकडे पामबीच मार्गावर येणारी वाहने एकल मार्गिकेवरून जात असल्याने या ठिकाणी सततचा चक्काजाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा…उरण : चिरनेरमध्ये दीड एकरात २५ टन कोकणी उसाचे उत्पादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पामबीच मार्गावर सुरु असलेल्या कामाबाबत तसेच रहदारीबाबत ठेकेदाराला योग्य ती खबरदारी घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. – गिरीश गुमास्ते, कार्यकारी अभियंता, नमुंमपा