नवी मुंबई: नवी मुंबईतील नेरुळ येथील ” ज्वेल्स ऑफ नवी मुंबई ” मध्ये मुंबईतील एका इसमाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गणेश परशुराम मिसाळ, वय ३५ वर्षे, असं इसमाचं नाव असून तो चेंबूर येथील रहिवासी आहे. हाताची नस कापून घेत आत्महत्याचा त्याने प्रयत्न केला.

घरगुती तसेच कौटुंबिक वादातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी समोर आली. या बाबत माहिती मिळताच नेरुळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडे यांनी पोलीस पथक पाठवले. जखमी इसमाला तात्काळ डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकृती गंभीर असली तरी जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या मिसाळ यांची प्रकृती स्थिर आहे अशा माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाईकवाडी यांनी दिली. मिसाळ हे बोलण्याच्या स्थितीत आल्यावर त्यांनी हे का केले याची माहिती समोर येईल असेही नाईकवाडे यांनी सांगितले.