पनवेल : पनवेल तालुक्यातील नेरे गावाच्या रस्त्यावर दोन पिस्तुल आणि गोळ्यांसह तीघांना नवी मुंबई पोलीसांनी रविवारी रात्री साडेआठ वाजता अटक केली आहे. पिस्तुल विक्रीसाठी हे संशयीत तरुण नेरे गावाजवळील कॅफे दूकान आणि मटन विक्रीच्या दूकानाजवळ येणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलीसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीसांनी येथे सापळा रचला होता. 

हेही वाचा…उरण : वाढत्या प्रवाशांना एनएमएमटी सेवेची अपेक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबई पोलीसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सध्या नवी मुंबई बेकायदा राहणा-या बांगलादेशी नागरीकांसाठी शोध मोहीम हाती घेतली आहे. याच अनुषंगाने शोध मोहीमेमध्ये पिस्तुल विक्रीसाठी काही संशयीत नेरे गावाजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी नेरे गावाजवळील मुख्य रस्त्याच्या चौकातील न्यू रॉयल कॅफे दूकानासमोर सापळा रचल्यावर त्यामध्ये संशयीत २४ वर्षीय किशोर धाडी (रिक्षाचालक, रा. बोनशेत), २५ वर्षीय ऋषिकेश लोटे (रा.वलप), २४ वर्षीय यशवंत सत्रे (रा.वलप) यांची अंगझडती घेतल्यावर त्यांच्याकडे दोन पिस्तुल आणि एक गोळी सापडली. संशयीतांकडून स्विफ्ट मोटार आणि दुचाकीसुद्धा पोलीसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी अजून एका संशयीताच्या शोधात पोलीस आहेत.