नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख विजय माने यांनी नेरुळ सेक्टर १६, १८ परिसरांत होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी बेकायदा कमानी काढण्यावरून पोलिसांशी झालेल्या वादात शिवसेना ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख सतीश रामाणे यांच्या नावाने शिवीगाळ करत त्यांना ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे नेते असताना आम्हाला त्रास देत असून आमच्या नवरात्रोत्सवासाठी लावलेल्या कमानी काढण्याचे काम करून आम्हाला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे असा आरोप विजय माने यांनी केला. नेरुळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवडी हे तरी राहतील किंवा मी तरी राहीन असा इशारा देत आत्महत्येची धमकीही दिल्याने या परिसरात गुरुवारी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. नवरात्रोत्सव सुरू करण्यावरुन धुसफूस झाल्याने दोन्ही गटांना सुरुवातीला पोलिसांनी दोघांनाही परवानगी नाकारली होती. त्यानंतर माने यांना परवानगी मिळाल्यानंतर उत्सवाच्या ठिकाणी बेकायदा कमानीवरून वादंग निर्माण झाला. माने यांनी शिवीगाळ करत थयथयाट केला. पोलिसांसमोरच फेसबुक लाईव्ह करत रामाणे यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

हे ही वाचा…नैना’प्रकल्पांचे उद्या भूमिपूजन, पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनानंतर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता

मी ३० वर्षे या विभागात नवरात्रोत्सव साजरा करत असून माझ्या नवरात्रीच्या ठिकाणी रामाणे यांच्या सांगण्यावरून कमानी हटवण्यासाठी पोलीस कारवाई करण्यासाठी आले होते. त्यामुळे आमचे दैवत दिघेसाहेब तसेच मुख्यमंत्र्यांचे फलक उतरवले आहेत. हा आमच्या दैवताचा अपमान असून हा अपमान आम्ही सहन करणार नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेत तक्रार करणार आहे. विजय माने, शहरप्रमुख, शिवसेना (शिंदे)

माने यांना नवरात्र उत्सवासाठी परवानगी दिली आहे. तेथे रस्त्याला अडथळा होणारी बेकायदा कमान काढण्यासाठी कार्यवाही केली जाता असताना माने यांनी गोंधळ घातला. त्यांनी कोणाचे नाव घेतले नसल्याने अद्याप गुन्हा दाखल केला नाही. – ब्रह्मानंद नायकवडी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नेरुळ

हे ही वाचा…नैना’प्रकल्पांचे उद्या भूमिपूजन, पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनानंतर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्र्यांच्या नावाने त्यांचे कार्यकर्ते व विजय माने आमचा खून करण्याचे खुले आव्हान देत आहेत. त्यामुळे शिंदे गटाने महाराष्ट्राचा बिहार करून ठेवला आहे. माझ्या जीविताला धोका असून याबाबत शुक्रवारी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहे. – सतीश रामाणे, उपशहरप्रमुख, शिवसेना (ठाकरे)