नवी मुंबई शहरात गेल्या महिन्याभरापासून हवा गुणवत्ता निर्देशांक घसरत चालला असून २०० ते ३०० एकक्यूआय हून अधिक आढळत आहे. नेरूळ विभाग राज्यात आघाडीवर असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. नवी मुंबई शहरात वाहन प्रदूषण अधिक आहे , तसेच जेएनपीटीमधील अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहेत.  शहराचा २५% भाग औद्योगिक क्षेत्र आहे. त्यामुळे औद्योगिक प्रदूषण, एकंदरीत यामुळे नवी मुंबई शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक दिवसेंदिवस घसरत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका  शहरात अधिकाअधिक वृक्षारोपण करून जास्तीत जास्त हरित पट्टा निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. तसेच शहरातील वाहन वर्दळीच्या मुख्य ठिकाणी, चौका-चौकात पाण्याचे कारंजे बसवण्याचे नियोजन आहे .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नवी मुंबई : कोकण विभाग मतदार संघाच्या नवीन मतदार यादीत ३७ हजार ७१९ मतदार

यामुळे शहरातील प्रदूषित हवा नियंत्रणात आणण्यास मदत होईल, असे मत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले आहे. नवी मुंबई शहरात महापे पावणे आणि तळोजा औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वसले आहे. शहरातील २५ टक्के भाग औद्योगिक क्षेत्राने व्यापला आहे. त्याच बरोबर शहरात मोठ्या प्रमाणावर नवीन बांधकामे,  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. वाहनांमुळे ही हवा प्रदूषण होत असल्याचे निकष लावले जात आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहराची हवा गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे. सोमवारी रात्री नेरुळ से.१९ अ येथील हवा गुणवत्ता निर्देशांक हा ३६४  एक्युआय तर नेरुळ येथील हवा २९१ एक्युआय आणि कोपरखैरणे येथील १७० एक्युआय होता. याअनुषंगाने नवी महानगरपालिकेने शहरातील प्रदूषित हवा नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे उद्दिष्ट आखले आहे. केंद्र शासनाच्या क्लीनएअर  कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. शहरातील हवा प्रदूषण नोंदी घेण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी अधिक प्रदूषण आहे, त्याठिकाणी प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. शहरात वनराई निर्माण करण्यात येत असून ११ ठिकाणी मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करून हरित संपदा वाढवण्यात येत आहे. शहरात अधिकाधिक वृक्ष असल्याने वातावरणातील हवा प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यात मदत होईल. तसेच शहरातील मुख्य चौक,  वाहने वाहतूक वर्दळ आहे त्या ठिकाणी  पाण्याचे कारंजे बसविण्यात येत आहेत. हे कारंजे हवेतील धूलिकण शोषून प्रदूषण कमी करण्यासाठी उपयोगी पडणार असल्याने शहरात विविध ठिकाणी बसविण्याचे नियोजन आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nmmc aims to control air pollution by installing green belts and water fountains in the city zws
First published on: 03-01-2023 at 23:48 IST