scorecardresearch

रुग्णसंख्या एक अंकी,चाचण्या सहा हजारांवरच; आतापर्यंत ३१ लाख ५७ हजारांपेक्षा अधिक चाचण्या

शहरात ३२ लाख ७१ हजार ८१३ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या एक अंकी झाली असून करोना स्थिती अत्यंत नियंत्रणात आहे. असे असले तरी पालिका प्रशासनाकडून लवकर निदान व लवकर उपचार ही कार्यप्रणाली कायम ठेवत दैनंदिन पाच ते सहा हजार चाचण्या करण्यात येत आहेत.
आतापर्यंत शहरात ३२ लाख ७१ हजार ८१३ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. नवी मुंबईत करोनाच्या पहिल्या लाटेत आलेल्या अनुभवानंतर पालिका प्रशासनाने निदान व लवकर उपचार ही कार्यप्रणाली स्वीकारली. रुग्णसंख कमी झाली तरी चाचण्या कायम ठेवण्यात आल्या. यासाठी वारंवार नेरुळ येथील प्रयोगशाळेची क्षमताही वाढवण्यात आली असून दिवसाला ५ हजार चाचण्या येथे करण्यात येत आहेत.
रुग्णसंख्या अत्यंतनियंत्रणात आल्यानंतर शहरात संपूर्ण र्निबध हटवण्यात आले असून सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. शहरात करोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या एक अंकी आहे आणि
यात गेले काही दिवस सातत्य आहे. असे असले तरी पालिका प्रशासन सतर्क आहे. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी दैनंदिन करोना चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. दिवसाला ५ ते ६ हजारांच्या पुढे चाचण्या करण्यात येत आहेत. लवकर निदान व लवकर उपचार ही कार्यप्रणाली कायम ठेवण्यात
आली आहे. नेरुळ येथील करोना चाचणी प्रयोगशाळेची मर्यादाही वाढवून दिवसाला ५ हजार करण्यात आाली आहे.
शहरात लोकसंख्येच्या तुलनेत करोना चाचण्यांचा दर हा मोठा आहे. तरंगती लोकसंख्या अंदाजे १६ लाख आहे. आतापर्यंत ३२ लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.
३२,३१,८१३
एकूण चाचण्या
१,५१,१९४
एकूण करोनाबाधित
१,४९,०३२
करोनामुक्त
२०४९
एकूण करोना मृत्यू
आतापर्यंत १,५१,१९४ जण करोनाबाधित झाले आहेत. दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेचा विस्फोट मोठा होता. शहरातील करोनाच्या प्रतिदिन चाचण्यांची संख्याही कायम ठेवण्यात आली आहे. – अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Number patients digit tests only six thousand so far more than 31 lakh 57 thousand tests amy

ताज्या बातम्या