नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोपरी गाव येथे तृतीय पंथीयांसाठी विशेष शौचालयाची उभारणी केली आहे. राज्यातील चौथा तर शहरातील पहिला उपक्रम असून मुंबई, पुणे व नागपूर पाठोपाठ आता नवी मुंबई शहरात ही अशा शौचालयाची निर्मिती केली आहे. त्यामुळे येथील तृतीय पांथियांनी समाधान व्यक्त केले आहे.

जगात स्त्री आणि पुरुष असे दोन घटक असेल तरी तृतीय पंथीय हा तिसरा घटक देखील आपले जीवन व्यतीत करत आहे. देशात तृतीय पंथियांना एक वेगळ्याच नजरेतून पाहिले जाते. त्यामुळे सामाजिक जीवनात त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र सन २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांना तृतीय लिंग म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे त्यांना इतर घटकांप्रमाणेच सर्व मूलभूत आणि सार्वजनिक सुविधा मिळण्याचा अधिकार मिळाला आहे. असे असले तरी सार्वजनिक ठिकाणी आजही नैसर्गिक विधी करीता तृतीय पंथीयांना पुरुष शौचालयाचा आधार घ्यावा लागतो.

हेही वाचा… लिंबाच्या दरात वाढ

मात्र पुरुष शौचालयात त्यांना छेडछाड सारख्या प्रकारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र शौचालयाची मागणी होती. ही मागणी लक्षात घेता नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने कोपरी गावात तृतीय पंथीयांसाठी विशेष शौचालयाची उभारणी केली आहे. या ठिकाणी जवळपास ७० ते ७५ तृतीय पंथीय वास्तव्यास आहेत. त्यामुळे महापालिकेने या विशेष शौचालयाची निर्मिती केल्याने संगीता पुजारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तृतीय पंथीयांची गरज लक्षात घेता नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने कोपरी गावात विशेष शौचालयाची निर्मिती केली आहे. प्राथमिक स्वरूपात याठिकाणी उभारणी करण्यात आली असून शहरात इतर ठिकाणी तृतीय पंथीयांची वस्ती पाहता इतर त्याठिकाणी देखील असे शौचालय उभारण्याचा विचाराधीन आहे. – संजय पाटील, कार्यकारी अभियंता, तुर्भे विभाग, नवी मुंबई महानगरपालिका