scorecardresearch

हेडफोनची सवय जीवावर बेतली; इमारतीतून बाहेर पडण्यासाठी शेजारी सांगत होते, पण त्याला ऐकू आलं नाही अन्…

नवी मुंबईतील बोनकोडे गावात अंदाजे पंचेवीस  वर्ष जुनी असलेली साई प्रसाद ही चार मजली इमारत कोसळली.

हेडफोनची सवय जीवावर बेतली; इमारतीतून बाहेर पडण्यासाठी शेजारी सांगत होते, पण त्याला ऐकू आलं नाही अन्…
नवी मुंबईत चार मजली इमारत कोसळली

शनिवारी रात्री नवी मुंबईतील बोनकोडे गावात एक धोकादायक इमारत पडली. इमारत पडण्याचा अंदाजा आल्याने सर्व रहिवाशी बाहेर पडले. हा राडा रोड्याचा ढिगारा उपसत असताना एक मृतदेह आढळून आला. इमारत रिकामी करताना सर्व रहिवासी  एकमेकांना इमारत रिकामी करण्याचे सांगत इमारतीतून बाहेर पडत होते. मात्र मयत व्यक्तीने हेडफोन लावल्याने बाहेर काय चाललेय हे त्याला कळलेच नाही, आणि शेवटी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचा- रुग्णालयासाठी उरण सामाजिक संस्थेची गांधीगिरी…

नवी मुंबईतील बोनकोडे गावात अंदाजे पंचेवीस  वर्ष जुनी असलेली साई प्रसाद ही चार मजली इमारत कोसळली. इमारतीसमोरील रस्त्यावरून जड वाहन गेले तर इमारत हलणे सुरु झाल्याने घाबरून अनेकांनी घर सोडून इतरत्र आसरा  घेतला. तर उर्वरित काही सदनिका धारकांनी शनिवार सकाळ पासून इमारत सोडणे सुरु केले होते. तिसर्या माळ्यावर (सदनिका क्रमांक ३०२) राहणारे प्रियवर्त  उर्फ मनोज सर्वेश्वर धल  .यांनाही अनेकांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांचा दरवाजाही अनेकदा वाजवला गेला. मात्र कायम हेड फोन लाऊन गाणी ऐकण्याची सवय असल्याने त्यांना ऐकू आले नसल्याचा अंदाज घटने नंतर अनेकांनी व्यक्त केला. त्यांचा दरवाजा केवळ आत जाताना आणि बाहेर पडताना उघडा असतो मयत मनोज यांच्या कानाला कायम हेड फोन असतो. अशीही माहिती समोर आली.

हेही वाचा- सायन- पनवेल मार्गावरील लुकलुकणाऱ्या दिव्याची दुरुस्ती

सदर इमारत रात्री साडे दहाच्या सुमारास पडली. याच वेळेस ते आपल्या पत्नीशी बोलत असल्याचे आढळून आले आहे. मनोज हे इलेक्ट्रिशियनचे काम करून गुजराण करीत होते सहा महिन्यापूर्वीच येथे राहावयास आले होते अशीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. घटना घडल्यानंतर राडा रोडाचा ढिगारा उपसताना त्यांचा मृतदेह आढळून आला. अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी प्रथम संदर्भ रुग्णालयात मृतदेह धाडण्यात आला आहे. अशी माहिती कोपरखैरणे पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या