वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा बटाटा घाऊक बाजारात नवीन कांदा दाखल होण्यास सुरुवात झाली असून, बाजारात आवक वाढत असल्याने सर्वच बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारातही मंगळवारी दर कमी झाले आहेत. कांदा किमान प्रतिकिलो ८ ते १४ रुपयांनी विक्री होत आहे.

एपीएमसीत टोमॅटो पाठोपाठ आता कांद्याचे भाव कमी झाले आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी कांद्याच्या दरात भरघोस वाढ झाली होती. परंतु, बाजारात आता नवीन कांद्याची आवक वाढली. कांद्याचे भाव हळुहळू पूर्वपदावर आले आहेत. राज्यात पडलेल्या थंडीमुळे कांदा उत्पादनास पोषक वातावरण तयार झाल्याने कांदा उत्पादनात वाढ होत आहे. त्यामुळे वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात नवीन कांद्याची आवक वाढली आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : तृतीय पंथियांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभाला भरघोस प्रतिसाद

हेही वाचा – नवी मुंबई : लाक्षणिक संपात बाजार बंद असल्याने भाजीपाला वधारला; भेंडी, गवार, वाटाणा, हिरवी मिरचीच्या दरात २० ते ३० टक्क्यांची वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील महिन्यात प्रति किलो २०-२६ रुपयांनी उपलब्ध असलेल्या कांद्याच्या दरात आता सातत्याने घसरण होत असून, दर आवाक्यात आले आहेत. राज्यातील सर्वच बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण होत आहे, त्यामुळे मंगळवारी एपीएमसीतही दर घटले आहेत. बाजारात कांद्याच्या १२९ गाड्या दाखल झाल्या असून, ग्राहक कमी असल्याने २५-३० गाड्या शिल्लक राहिल्या आहेत.