पनवेल ः तळोजा औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांवर हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या मोठी आहे. वेळोवेळी नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांमध्ये वाहतूक शिस्त येण्यासाठी दंड वसुलीच्या कार्यवाहीवर न थांबता तळोजातील वाहतूक विभागाच्या पोलिसांनी दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट उपलब्ध करुन दिले आहे. 

हेही वाचा – द्रोणागिरी परिसर खड्ड्यांत; पाऊस थांबल्याने मार्गावरील धुळीच्या उधळणीने प्रवासी आणि नागरिक त्रस्त

हेही वाचा – नवीन पनवेल येथील शिक्षण संस्थाचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये ३० वर्षांनंतर पहिल्यांदा वाहनतळाचा प्रश्न सुटला. त्यामुळे रस्त्याकडेला उभे राहऱ्या अवजड वाहनांचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. मात्र दुचाकीस्वार विना हेल्मेट तळोजातून अनेकदा येजा करताना दिसतात. वेळोवेळी अशा दुचाकीस्वारांवर दंडाची कारवाई करुनही हे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे तळोजा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कदम यांनी गरजू दुचाकीस्वारांना हेल्मेट उपलब्ध करुन देण्यासाठी वॉलरेक कंपनीच्या व्यवस्थापनासमोर हेल्मेट देण्याचा प्रस्ताव मांडला. वॉलरेक कंपनीनेसुद्धा पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शंभर हेल्मेट उपलब्ध करुन दिल्यावर गुरुवारी तळोजातील रस्त्यांवरील गरजू आणि विना हेल्मेट असलेल्या दुचाकीस्वारांना हे हेल्मेटचे वाटप करण्यात आले. यामुळे तळोजातील अपघातांचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम यांनी व्यक्त केली.