पनवेलः चुलते रिक्षाचालक आणि घरातील २३ वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता झाला. सर्वत्र शोधाशोध केली मात्र मुलाचा शोध लागला नाही. दोन दिवसांनी बेपत्ता मुलाच्या मोबाईलवरुन नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर लघुसंदेश आला आणि त्यामध्ये ५० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी अपहरणकर्त्यांनी केली होती. पोलीसांत गेल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. रिक्षाचालक पित्याने तातडीने पोलीसांत धाव घेतली त्यानंतर पोलीसांची तपासाची चक्रे फीरली. अपहरणकर्त्यांचा शोध पोलीसांनी कसा लावला. मुलगा सूखरुप घरी कसा आला हे पुढे वाचा…

हेही वाचा >>> “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” गटाची नवी मुंबईत गुरुवारी महाप्रबोधन यात्रा

पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द येथील मिनाक्षी नगर येथे लतेश पुजारी हे रिक्षाचालविण्याचा व्यवसाय करतात. पुजारी कुटूंबियांमधील लतेश यांचा पुतण्या यतिश याने बारावीचे शिक्षण घेतले असून तो पनवेल शहरातील एका खासगी शैक्षणिक संस्थेत आय.टी.चे शिक्षण घेतो. लतेश यांचा पुतण्या ४ ऑक्टोबरला दुपारी दिड वाजल्यापासून बेपत्ता झाला होता. पुजारी कुटूंबियांनी व यतीशच्या मित्रांनी त्याचा ठिकठिकाणी शोध घेतला मात्र त्याचा शोध लागला नाही. मात्र दोन दिवसांनी ६ ऑक्टोबरला यतीश यांच्या वहिणीच्या मोबाईलवर व्हॉट्सॲस संदेश आला.

हेही वाचा >>> विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

या संदेशामध्ये यतीशचा सेल्फी काढलेला फोटा आणि ५० कोटी रुपयांची खंडणी अपहरणकर्त्यांनी मागीतल्याचे म्हटले होते. तसेच पोलीसांत याबाबत वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. पनवेल शहर पोलीसांत या मोबाईलच्या संदेशाची माहिती पुजारी यांनी दिल्यानंतर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबाणे यांनी अपहरणकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदविला. तसेच ज्या मोबाईलवरुन खंडणीच्या रकमेची मागणी करण्यात आली तो मोबाईल फोन पोलीसांनी लक्ष्य ठेवण्यात सूरुवात करण्याचे आदेश पोलीस अधिकारी कादबाने यांनी दिले. त्यामुळे तो फोन सध्या कुठे आहे याची माहिती घेण्यात आली. यादरम्यान यतीशच्या मोबाईलवरुन दूसरा फोन त्याच्या मंगळुरु येथे राहणा-या बहिणीला (त्रीवेणी) झाल्याचे पोलीसांच्या तांत्रिक तपास करणा-या पथकाला समजले.

हेही वाचा >>> पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

या फोनवरुन तामिळनाडूवरुन मंगळुरु येथे प्रवासासाठी पैसे मागण्यात आले होते. तसेच या प्रवासातील बसचा वाहकाचा नंबरवर गुगल पे करण्याचे सांगण्यात आले होते. दोनही संदेश पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीसही यतीशच्या मोबाईल फोनचा माग काढत होते. दोन दिवस व रात्रभर पनवेल शहर पोलीस व तांत्रिक तपास करणारे नवी मुंबई पोलीसांचे पथक यतीशच्या मोबाईलनंबरचा माग काढत होते. मंगळुरु येथे दोन दिवसांनी बहिणीच्या घरी यतीश  सूखरुप पोहचल्यानंतर त्रिवेणी यांनी तो घरी आल्याचे पनवेलच्या त्यांच्या नातेवाईकांच्या घरी कळविले. त्यानंतर मंगळवारी यतीशला पनवेलला त्याच्या चुलत्यांनी आणले. पनवेल शहर पोलीस ठाण्यात त्याच्यासोबत नेमके काय झाले याची माहिती पोलीसांनी घेतल्यावर त्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने स्वताहूनच हे केल्याची कबूली पोलीसांना दिली. यतीशचे वडीलांचे निधन झाले असून तो व त्याची आई चुलत्यांसोबत संयुक्त कुटूंबात राहतात अशी माहिती पोलीसांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.