नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे एपीएमसी भाजीपाला बाजारात दाखल होणाऱ्या पालेभाज्या पावसाने भिजून खराब झाल्या आहेत. विशेषत: कोथिंबीर आणि मेथीला जास्त फटका बसलेला आहे. परंतु, दर मात्र स्थिर आहेत.

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होणाऱ्या भाज्या खराब होत आहेत. विशेषतः पालेभाज्या लवकर नाशवंत होत आहेत. सोमवारी बाजारात भाजीपाल्याच्या एकूण ७६८ गाड्या दाखल झाल्या असून यामध्ये ४० गाड्या पालेभाज्यांच्या आहेत. परंतु, अवकाळी पावसाने या पालेभाज्यांना फटका बसला आहे. पुणे-नाशिक येथून दाखल झालेला भाजीपाला खराब अवस्थेत आहे. ४० गाड्यांपैकी ७ ते ८ गाड्यांमधील शेतमाल खराब झाला आहे. जास्त भिजल्याने तो फेकून द्यावा लागत आहे. परंतु, सध्या तरी पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत. घाऊक बाजारात पुणे येथील कोथिंबीर ६ ते ७ रुपये, तर नाशिकमधील कोथिंबीर १६ ते २० रुपयांनी उपलब्ध आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा एप्रिल अखेरीस कार्यान्वित होणारच- आयुक्त नार्वेकरांचा निर्धार

हेही वाचा – नवी मुंबई : महालक्ष्मी सरस प्रदर्शन आणखी एक दिवसाने वाढवले, सोमवारी शेवटचा दिवस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एपीएमसी बाजारात अवकाळी पावसामुळे भिजलेल्या पालेभाज्या दाखल झाल्या आहेत. यामध्ये कोथिंबीर आणि मेथीला जास्त फटका बसला असून खराब असल्याने फेकून देण्याची वेळ आली आहे, असे एपीएमसीतील घाऊक व्यापारी भाऊसाहेब भोर म्हणाले.