नवी मुंबई – नवी मुंबई हे शहर हे सुंदर असून त्याच्या सौंदर्यात अधिक भर घालून शहराला गतिमान करणार आहे.स्वच्छ सर्वेक्षणामध्ये हे शहर कायम आघाडीवर असून या शहरात स्पर्धेतील क्रमांकाबरोबरच  प्रत्यक्ष शहरात झालेला सुंदरतेचा बदल दिसून येतो. त्यामुळे हे शहर अधिक सुंदर करण्याचा माझ्या परीने प्रयत्न करेन.

जिल्हाधिकारी म्हणून काय करू नये याचे निर्बंध लावण्याचे काम केले जाते परंतु आयुक्त म्हणून काय करावे ते शहरात करून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार  असल्याचा विश्वास नवी मुंबई महापालिकेचे  आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पदभार स्वीकारताना व्यक्त केला. सत्ताबदलानंतर शिंदे सरकारने प्रशासनात मोठय़ा प्रमाणावर खांदेपालट केला आहे. ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. ठाणे पालिका आयुक्तपदी अभिजीत बांगर, तर नवी मुंबई आयुक्तपदी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई पालिका आयुक्त  नार्वेकर यांनी पदाचा कार्यभार स्विकारला आहे.