नवी मुंबई: लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर सिडकोने पुन्हा ७,८४९ घरांच्या विक्रीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केला. या वर्षात सिडकोने ही तिसऱ्यांदा सोडत काढली आहे. त्यामुळे विविध आर्थिक स्तरातील नागरिकांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्यामध्ये सिडको महामंडळ संपूर्ण देशात अग्रेसर आहे असे प्रशंसोद्गगार मुख्यमंत्री शिंदे यांनी काढले. सिडकोने दिपावलीच्या मुहूर्तावर २४ ऑक्टोबर रोजी ७,८४९ घरांच्या विक्रीचा प्रारंभ करण्यात आला. सिडकोच्या या महागृहनिर्माण योजनेतर्गत नवी मुंबईतील उलवे नोडमधील बामणडोंगरी, खारकोपर पूर्व2ए, खारकोपर पूर्व २बी आणि खारकोपर पूर्व पी३ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांकरिता परवडणाऱ्या दरातील ७,८४९ घरे (सदनिका) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस २५ ऑक्टोबर २०२२ पासून सुरुवात होणार आहे.

“सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे भविष्यात उलवे नोडला मोठ्या प्रमाणावर महत्त्व प्राप्त होणार आहे. सिडकोने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणलेल्या महागृहनिर्माण योजनेद्वारे परिवहनदृष्ट्या समृद्ध असणाऱ्या उलवे नोडमध्ये घर घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. -डॉ. संजय मुखर्जी,उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

pune airport latest marathi news
पुणे ठरले उणे! आंतरराष्ट्रीय उड्डाणात छोट्या शहरांनीही टाकले मागे; जाणून घ्या स्थान…
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
no international airport pune city marathi news
पुणे : उद्योगांना पूरक पायाभूत सुविधांची बोंब!
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ

हेही वाचा : विश्लेषण : नागपूर ते गोवा केवळ ८-१० तासांत? ‘शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग’ कसा आहे?

सिडकोतर्फे आपल्या गृहनिर्माण योजनांद्वारे सातत्याने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता परवडणाऱ्या दरातली घरे उपलब्ध करून देण्यात येतात. सिडकोने नवी मुंबई क्षेत्रात आजवर सुमारे दीड लाखांहून घरे बांधली आहेत.

नवी मुंबईतील झपाट्याने विकसित होणारा उलवे नोड हा परिवहन सुविधांनीही समृद्ध आहे. महागृहनिर्माण योजनेतील गृहसंकुलांना नेरूळ-उरण रेल्वे मार्गावरील बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. तसेच प्रस्तावित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) द्वारेही उलवे नोडला कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उलवे नोडपासून जवळच्या अंतरावर आहे. गृहसंकुलांचा परिसर हा शाळा, महाविद्यालये, रुग्णालय इ. मूलभूत सुविधांनी परिपूर्ण आहे.

हेही वाचा : उरण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुर्दशा; वाहनचालकांना होतोय मनस्ताप

महागृहनिर्माण योजनेतील सर्व प्रक्रिया या पारदर्शक अशा ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत. योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस २५ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरुवात होणार आहे. योजनेची संगणकीय सोडत १९ जानेवारी २०२३ रोजी पार पडणार आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी, शुल्क भरणा इ. करीता https://lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिकाधिक नागरिकांना योजनेचा लाभ घेऊन आपले हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.