जेएनपीटी मधून दुबईतील जेबेल अली बंदरात निर्यात करण्यात आलेल्या संशयित कंटेनरमधून अडीच कोटींचे तीन मेट्रीक टन रक्तचंदन जेएनपीटी सीमा शुल्क विभागाच्या सीआययू ने जप्त केले आहे.जेएनपीटी बंदरातून दुबईत निर्यात करण्यात आलेल्या मालाच्या कंटेनर बाबत सीमा शुल्क विभागाला संशय होता. त्यामुळे केंद्रीय गुन्हे पथकाने हा कंटेनर परत मागविला होता. या दुबईतून परत मागविण्यात आलेल्या कंटेनर ची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निर्यात करण्यात आलेला सुमारे ३ मेट्रिक टन रक्तचंदन आढळले आहे.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांनी दि. बा .पाटील कुटूंबियांची पनवेलमध्ये भेट घेतली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन आठवड्यापूर्वी उरण परिसरातील सीएफएस(गोदामातून) अशाच प्रकारे सुमारे ३ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करीत असतांना समोर आलेल्या माहिती वरून सीमा शुल्क विभागाने हा निर्यात झालेला संशयित कंटेनर परत मागविला होता. या कंटेनर मध्ये हे तस्करी करण्यात आलेले रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे.