नवी मुंबई: नवी मुंबई शहर स्वच्छतेमध्ये सातत्याने मानांकन उंचावत राहिले असून यावर्षी देशात तृतीय क्रमांकाचे शहर म्हणून नावाजले गेले आहे. या मानांकनात सर्वात महत्वाचे योगदान स्वच्छताकर्मींचे असून ‘निश्चय केला नंबर पहिला’ हे आपले ध्येय साध्य करण्यासाठी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ अंतर्गत आयोजित सफाईमित्रांना (फ्रंट वर्कर) आपत्तीविषयक विविध बाबींच्या प्रशिक्षण देण्यात येत आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आपत्ती धोके प्रतिबंध विषयावर म्हणजेच आग, भूकंप, रासायनिक आपत्ती बाबात ध्वनीचित्रफितीव्दारे जनजागृती, दैनंदिन जीवनात येणाऱ्या विविध आपत्तींवर मात करण्यासाठी मार्गदर्शन, मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यादृष्टीने ऑनलाईन आरटीई प्रवेश प्रणालीबाबतचे मार्गदर्शन, मातृत्व शिशू जननी सुरक्षा योजनेबाबत मार्गदर्शन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी बेलापूर विभागातील १७ व नेरूळ विभागातील १३ अशा ३० गटांना प्रशिक्षण देण्यात आले.

हेही वाचा: उरण: नवघर उड्डाणपुलावर खड्डे, अंधार आणि झाडे झुडपे; अपघाताची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी दि. ३० रोजी वाशी आणि तुर्भे मधील गटांना प्रशिक्षण देण्यात आले. उद्या ही उर्वरित गटांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना त्याचप्रमाणे वैद्यकिय अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांनी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम तसेच शिक्षण विस्तार अधिकारी सुलभा बारघरे यांनी राईट टू एज्युकेशन या विषयाची माहिती दिली व उपस्थितांशी संवाद साधत त्यांचे शंकानिरसन केले. यावेळी अग्निशमन अधिकारी यांनी अग्निशमन विषयक प्रात्यक्षिकेही करून दाखविली.