नवी मुंबई : मुंबईत प्रवेश करताना एकच पथकर असावा याबाबत भाजप विचार करीत आहे, अशी माहिती भाजपचे ठाणे लोकसभा संयोजक विनय सहस्रबुद्धे यांनी दिली. ठाणे लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या जाहीरनाम्याबाबत माहिती देण्यासाठी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पक्षाचा जाहीरनामा हा त्या भागातील नागरिकांच्या अपेक्षानुसार तयार करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. या बाबतची माहिती सहस्राबुद्धे यावेळी दिली. नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टलचे भाजपचे नवी मुंबई अध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन करण्यात आले.

हेही वाचा >>> Flamingo City: नवी मुंबई फ्लेंमिंगो सिटी होतेय पण त्यामागचं कटू वास्तव माहितीये का?

मुंबईत प्रवेश करण्यासाठी अनेक पथकर भरावे लागतात. यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला येतात़ त्याचबरोबर पासाळ्यातील चार महिने खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे पथकरातून दिलासा मिळेल का, असा प्रश्न सहस्त्रबुद्धे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हा धोरणात्मक विषय असल्याचे सांगितले. तसेच सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याचे मान्य करीत मुंबई प्राधिकरणासाठी एकाच पथकर असावा याबाबत भाजप गांभीर्याने विचार करीत असल्याचे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकल्पांच्या उद्घाटनाबाबत मौन

भाजप लोकांसाठी झटणारा पक्ष असून लोकांच्या सुविधेसाठी प्रयत्नशील असल्याचे सहस्राबुद्धे यांनी सांगितले. त्यावेळी अनेक प्रकल्प केवळ उद्घाटनाअभावी रखडले असल्याचे सहस्राबुद्धे यांच्या निदर्शनास पत्रकारांनी आणले. त्यानंतर सहस्रबुद्धे कुठलेच उत्तर दिले नाही. तसेच पत्रकार परिषद आटोपती घेतली.