नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाने रात्री उशिरा येणाऱ्या उपनगरीय गाड्यांमधील प्रवाशांच्या सोयीसाठी बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान ३२ विशेष बससेवा सुरू केल्या आहेत.

पनवेल स्थानकावर १८ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरसाठी दोन ट्रॅक (अप आणि डाऊन) बांधण्याच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने बेलापूर ते पनवेल रात्रीचा ब्लॉक घेतला आहे. या करिता सुमारे साधारणतः ४५ दिवसांचा लागणार असून २ ऑक्टोबरपर्यंत असण्याची शक्यता आहे. या कालावधीत पनवेल स्टेशन यार्डमध्ये रात्रीचे तीन ते चार तासांचे ब्लॉक लागू करण्यात आले आहेत.

हेही वाचा… पोलिसांनी काय केली विनंती? मुस्लिम समाजाचा तात्काळ सकारात्मक प्रतिसाद…

रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाच या पाच तासांसाठी हा ब्लॉक घेतला जात असून २ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे. ब्लॉक कालावधीत, सीएसएमटी ते पनवेलपर्यंतच्या काही उशिरा रात्रीच्या सेवा रद्द केल्या जात आहेत किंवा कमी केले. त्याचप्रमाणे, पनवेल येथून पहाटेच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा… मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पुनर्विकासाच्या उंबरठ्यावर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एनएमएमटी यादरम्यानच्या कलावधीत ८ अतिरिक्त बस तसेच ३२ फेऱ्या वाढविल्या आहेत. बेलापूर ते पनवेल दरम्यान एकूण ३२ विशेष सेवा चालवत आहे. या बस सायन-पनवेल महामार्गावरून धावतील.” त्यांनी जोडले की शेवटची पहिली बस मध्यरात्री १२ वाजता सुरू होते आणि शेवटची बस पनवेलहून सकाळी ६.३४ आणि बेलापूरहून सकाळी ७.२६ वाजता असणार आहे .