नवी मुंबई : एपीएमसी बाजारात ऑक्टोबरअखेर आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू होतो. पाचगणी आणि महाबळेश्वरमध्ये काही ठिकाणी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली असली तरी पावसामुळे काही ठिकाणी लागवड झालेली नाही. लागवड केलेल्या रोपट्यांना पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे हंगामाला १५ दिवस उशिराने सुरुवात होणार आहे. परिणामी सध्या बाजारात स्ट्रॉबेरी कमी प्रमाणात दाखल होत आहे.

हेही वाचा…माध्यमिक शाळांच्या वेळेत दिवाळी सुट्टीनंतर बदल, माध्यमिक शाळा पूर्वीप्रमाणेच सकाळी ८ ते २ या वेळेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्ट्रॉबेरी चा मुख्य बहर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यांत असतो. हा बहर जून महिन्यापर्यंत सुरू राहतो. डिसेंबर, जानेवारी महिन्यांत सर्वाधिक स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी दाखल होत असून ऑक्टोबर अखेर- नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला वाशीच्या एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात होते. बाजारात सध्या तुरळक आवक होत आहे. महाबळेश्वर स्ट्रॉबेरी प्रतिकिलो ४०० ते ७०० रुपये तर नाशिकच्या स्ट्रॉबेरीची ३०० ते ५०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. साधारणत: स्ट्रॉबेरी पिकाचे उत्पादन निघण्यासाठी दोन ते अडीच महिने कालावधी लागतो. त्यामुळे अद्याप लागवड न झालेल्या उत्पादनाला जानेवारी महिना उजाडेल तर लागवड झालेले उत्पादन नोव्हेंबर अखेर बाजारात दाखल होईल, अशी माहिती व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली आहे.