पनवेल : नवी मुंबई पोलीस सध्या एका नराधमाच्या शोधात आहेत. पीडीत बालिका 15 वर्षांची असून ती चार महिन्यांची गरोदर झाल्यानंतर तीच्या आईला याबाबत समजले. नेरुळमध्ये राहणारी व मुलांच्या पालन पोषणासाठी घरकाम करणा-या आईने याबाबतची तक्रार नेरुळ पोलीसांना दिल्यावर मंगळवारी मध्यरात्री तातडीने नवी मुंबई पोलीसांनी या घटनेची नोंद केली.

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविल्यावर तातडीने पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फणसवाडी (वलप) गावात या नराधमाने बालिकेचे दोन वर्षे शोषण केल्याचे समजल्याने हा गुन्हा तालुका पोलीसांकडे नेरुळ पोलीसांनी तपासासाठी वर्ग करण्यात आला. या गंभीर प्रकरणाची नोंद घेत वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र दौंडकर यांनी या प्रकरणी पोलीस निरिक्षक अंकुश खेडकर व सहाय्यक पोलीस निरिक्षक अंबिका अंधारे यांचे पथक नेमून याबाबत तपास करण्याची सूचना दिली.

हेही वाचा : नवी मुंबईत उभे राहतेय स्थानिक स्वराज्य संस्थेचे देशातील व राज्यातील पहिले वृद्धाश्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पनवेल तालुक्यातील वलप गावातील फणसवाडी या गावातील एका तरुणाच्या संपर्कात गेल्या दोन वर्षांपासून संबंधित पिडीताचे शोषण केले जात असल्याचे तीच्या आईला समजल्यावर या घटनेला वाचा फुटली. पनवेल तालुका पोलीस या प्रकरणातील संशयीत आरोपीचा शोध घेत आहेत.