भूमिपुत्रांनी केलेल्या आंदोलनानंतर नवी मुंबई आंतररष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि बा पाटील यांचे नाव देण्याचे शासनाने मान्य केले असून तसा ठराव मांडण्यात आला. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समस्त भूमिपुत्रांतर्फे आभार मानले जाणार आहेत. तसेच राज्यात ज्याप्रमाणे इतर आर्थिक विकास महामंडळे आहेत त्याच धर्तीवर दि बा पाटील यांच्या नावाने प्रकल्पग्रस्त आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी अशी मागणी देखील करण्यात येणार आहे. अशी माहिती आगरी कोळी युथ फावूंडेशनमार्फत देण्यात आली.

हेही वाचा- नवी मुंबई : एपीएमसी सभापतीची निवड लांबणीवर; संचालक मंडळाची बैठक पुढे ढकलली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रशमन शुल्क आकारून भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घर नियमित केली जाणार आहेत. यामध्ये असणारा संभ्रम दूर करण्याचे साकडे यावेळी घातले जाणार आहे. या भूमिपुत्र मेळाव्यात खारी कळवा शेतकरी संघटना, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ समिती, हास्य कलाकार संजीवन म्हात्रे, मल्ल राजू चौधरी, यांचा सन्मान केला जाणार आहे. बारवी प्रकल्पग्रस्त ज्या पद्धतीने मनपाच्या आस्थापनेवर सामावून घेण्यात आले त्याच धर्तीवर नवी मुंबई शहरातील प्रकल्पग्रस्त सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. नवी मुंबई शहरातील जमीन नियमनमुक्त करून सिडको हटवा या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल घणसोली येथे निर्माण करण्याचा बाबत आग्रह धरण्यात आला आहे.या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ ,केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील,अतुल दिबा पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत.करावे येथील गणपत तांडेल मैदानावर तेरा जानेवारी रोजी दुपारी हा मेळावा संपन्न होणार आहे.