उरण: करंजा ते रेवस या पारंपरिक जलमार्गाच्या तिकीट दरात मंगळवार १२ सप्टेंबरपासून १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गाने रोजचा प्रवास करणाऱ्या कामगार आणि सामान्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी या मार्गावर २० रुपयांत एकेरी प्रवास करता येत होता. दरवाढीमुळे या प्रवासाकरीता आता ३० रुपये मोजावे लागणार आहेत.

नुकताच १ सप्टेंबर पासून या प्रवासात बोटीत दुचाकी घेऊन शंभर रुपायात प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाली होती यामध्ये ही वाढ होण्याची शक्यता आहे. या जलमार्गामुळे उरण ते अलिबाग दरम्यानच्या रस्ते प्रवासातील ४० किलोमीटर मीटरचे खड्ड्यातील प्रवास वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होत आहे. त्याचप्रमाणे विना अडथळा आनंददायी प्रवास करण्याची संधी प्रवाशांना मिळत आहे.

हेही वाचा… एपीएमसीत टोमॅटोचे दर गडगडले; सोमवारी बाजारात प्रतिकिलो ५-१०रुपये, अत्यल्प दराने शेतकरी हवालदिल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उरणच्या करंजा ते अलिबाग तालुक्यातील रेवस असा जलमार्गाने शेकडो वर्षांपासून प्रवास सुरु आहे. ही जलसेवा बारमाही सुरू असते. या मार्गाने १५ ते २० मिनिटात पोहचता येते. तर अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आहे. त्याचप्रमाणे येथे अनेक पर्यटनस्थळ पाहण्यासाठी ही याच मार्गाने ये जा करण्यासाठी मुंबई व नवी मुंबईतील प्रवासी ही प्राधान्य देत आहेत. वाहतुकदाराच्या मागणीवरून या मार्गावरील तिकीट दर वाढ करण्यात आली असल्याची माहिती करंजा बंदर निरीक्षण अनिल शिंदे यांनी दिली आहे. ही वाढ २०१६ नंतर करण्यात आली आहे.