नवी मुंबई : सरकारच्या दडपशाही विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने सभा आणि त्या नंतर मोर्चाचे आयोजन केले आहे . यात पोलीस आयुक्तांनी मुंबई पोलीस गृह विभागाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात आज पोलीस आयुक्तालय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अद्याप पोलीस आयुक्तालयावर ठाकरे गटाचे नेते पोहचले नसून ते थोड्याच वेळात पोहचणार आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सह, अग्निशमन गाड्या, दंगल विरोधी गाडी आणि पथक,तैनात करण्यात आले आहे. तसेच सेवेसाठी रुग्णवाहिका असा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, प्रवक्त्या मनीषा कायंदे हे प्रमुख नेते आणि स्थानिक शिवसेना प्रमुख विठ्ठल मोरे व द्वारकानाथ भोईर आदी शिष्टमंडळ पोलीस आयुक्त यांची या प्रकरणी भेट घेणार आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav balasaheb thackeray shivsena rally against government police commissionerate navi mumbai tmb 01
First published on: 19-10-2022 at 14:29 IST