लोकसत्ता प्रतिनिधी

उरण : जागतिक प्रदूषणाची नोंद करणाऱ्या संस्थेने केलेल्या निरीक्षणातून गुरुवारी सकाळी उरण हे देशातील हवेतील धुळीकणाच्या कक्षेत देशातील शहरांच्या पहिल्या क्रमांकावर आला आहे. बुधवारी असलेला हवेचा निर्देशांक(ए क्यू आय) १०३ वाढून १९६ वर पोहचला आहे. मार्च २०२२ मध्ये हा क्रमांक दुसरा होता. यात वाढ झाली आहे. त्यामुळे उरणकारांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तर बेगूसराय दुसऱ्या आणि टूटुकोरीन तिसऱ्या स्थानावर आहे.

Changes in transport system due to PM Narendra modi meeting Pune print news
पंतप्रधानांच्या सभेमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल
international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे

१० फेब्रुवारी २०२२ मध्ये उरण येथील प्रदूषणाची नोंद ही जागतिक स्तरावर ७ व्या क्रमांकावर आणि देशात ४ था स्थानावर करण्यात आली होती. यामुळे पर्यावरणवाद्यांनी त्यावेळी चिंता व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. नॅट कनेक्ट फाऊंडेशनमार्फत करण्यात आलेल्या सुचनेनंतर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत पर्यावरण आणि अर्बन डेव्हलपमेंट विभागाला याची पाहणी करण्याच्या सूचना केल्या होत्या.

आणखी वाचा-पनवेल : गणेश मूर्तीदान करणाऱ्या कुटूंबियांना ‘पर्यावरण दूत’ पदवी महापालिका देणार

या वातावरणातील हवेची नोंद करणाऱ्या संस्थेमार्फत गुरुवारी सकाळी उरण येथील प्रदूषणाची मोजणीची नोंद १९६ ए क्यू आय करण्यात आली आहे. ज्यामुळे, हवेत धूळ असल्याचे समोर आले आहे.श्वसनाचे आजार असलेल्या व सामान्य नागरिकांना मुखपट्टी(मास्क)लावण्याची सूचना करण्यात आली आहे.