उरण : शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता उरण पोलीस ठाण्यातील दूरध्वनी खणखणला यावेळी करंजा बंदरात अलीबागच्या दिशेने दोन बंदूकधारी दहशतवाद्यांनी प्रवासी बोट हाय जॅक केल्याने प्रवाशांना ओलीस धरल्याची माहिती मिळाली. या सुचने नंतर तातडीने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलीस यंत्रणा तातडीने करंजा बंदराच्या दिशेने रवाना झाली. पोलिसांनी करंजा रेवस जलसेवा असलेल्या प्रवासी बोटीला घेराव घालत बोटीवरील दहा प्रवासी यांच्यासह दोन दहशतवादी यांच्याशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार करण्यात आला तर एकाला जीवंत पकडण्यात आले आहे. तपासणीत त्यांच्याकडून आरडीएक्स ही ताब्यात घेण्यात आले आहे.

यावेळी नवी मुंबई पोलिसांच्या सोमवारी सकाळी १०.३० वाजता करंजा जेट्टीवर रेवसहून तर पोहचली होती. या बोटीमध्ये दोन बंदूकधारी अतिरेक्यांनी बोटीतील प्रवाशांना ओलीस ठेऊन बोट ‘हायजॅक’ केली असल्याची माहिती उरण पोलीसांना देण्यात आली होती. यामुळे, उरण पोलीसांनी तातडीने घटनास्थळ गाठून शहानिशा केली असता दोन व्यक्तींच्या हातात मोठ्या बंदुकी असल्याचे दिसून आले होते. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनी नवीमुंबईतील क्यूआरटी, एटीएस पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर, क्यूआरटी पथकाने संशयित अतिरेक्यांची तपासणी आणि चौकशी केली असता हे ‘मॉकड्रिल’ असल्याचे आढळून आले होते.

यावेळी, सागरी सुरक्षा दलाच्या पथकासमवेत अग्निशमन दल, रुग्णवाहिका सुद्धा हजर झाले होते. या कारवाई दरम्यान उरण तालुक्यातील पोलीस अधिकारी यांच्या समवेत शंभरहुन अधिक कर्मचारी उपस्थित होते. हे मॉक ड्रिल तब्बल दोन तास सुरू होते. या मॉक ड्रिल मध्ये उरण, मोरा सागरी,न्हावा शेवा येथील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला असल्याची माहिती उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिली.