नवी मुंबई -ऐरोली सेक्टर-४ मधील दिवंगत काळू राघो सोनवणे हरितपट्टा ज्येष्ठांसाठी धोकादायक ठरत होता. दिवंगत काळू राघो सोनवणे हरितपट्टा  व या ठिकाणच्या उद्यानातील मुख्य लोखंडी प्रवेशद्वार व त्याच्या उंचीमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. कारण या लोखंडी प्रवेशद्वारामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना दुखापती होऊन रुग्णालय गाठावे लागले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने बनवलेल्या या हरितकट्ट्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन मुख्य प्रवेशद्वाराची उंची कमी करण्याची मागणी शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी पालिकेकडे केली होती. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिद्ध करताच  पालिकेने तात्काळ या ठिकाणी दुरुस्ती करीत मुख्य प्रवेशद्वाराची  उंची कमी केली आहे. त्याबद्दल  ऐरोलीतील ज्येष्ठ नागरिक संघानेही पालिकेचे आभार मानले आहेत.

हेही वाचा >>> Kharghar Incident : खारघर घटनेतील मृतांचा आकडा लपवला जात आहे; सरकारने राजीनामा द्यावा अन्यथा…, नवी मुंबई काँग्रेसचा इशारा

ऐरोली सेक्टर-४ मधील हरितपट्ट्याविषयी ज्येष्ठ नागरिकांची तक्रार आली होती. आता उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराची उंची कमी करण्यात आली असून अभियंता विभागाकडून इतर कामे करून घेण्यात येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अभियंता विभागामार्फत कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले आहे.

-महेंद्र सप्रे, विभाग अधिकारी, ऐरोली

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urgent repair by municipality in dangerous park in airoli ysh
First published on: 20-04-2023 at 19:44 IST