नवी मुंबई : दुबईत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून विविध ठिकाणी बोलावून लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे.
दुबई मध्ये मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पीडित महिलेवर जबरदस्ती बलात्कार करणाऱ्या सिराज इद्रीस चौधरी,( वय ५५ वर्षे, राहणार मुंबई) याला वाशी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने दुबईत जास्त पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून पीडित महिलेवर तिच्या कामाच्या ठिकाणी आणि अन्य ठिकाणी जबरदस्तीने बलात्कार केला.
पीडितेने याबाबत वाशी पोलिस ठाण्यात तक्रार देताच वाशी पोलिसांनी आरोपी सिराज इद्रीस चौधरी याला अटक केली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. इद्रीस चौधरी याच्यावर या आधी देखील गुन्हे दाखल असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे.अशी माहिती तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे यांनी दिली आहे.