देशात सर्वाधिक व्यस्त मार्ग असलेल्या शीव  पनवेल (सायन पनवेल) मार्गावरील उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे पडलेले आहेत. त्यात सर्वाधिक खड्डे हे बेलापूर खिंड भागातील उड्डाणपुलावर मुंबई मार्गिकेवर पडले असून दिवसरात्र संततधार पाऊस त्यात प्रचंड वाहतुकीमुळे खड्डे बुजविण्यास उसंत मिळत नाही.   

हेही वाचा >>> माथेरानच्या मंकी पॉईंट जवळ दरड कोसळली, धोदाणी ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेलापूर खिंड उड्डाणपुलावर या खड्ड्यामुळे  वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरु आहे. त्यात एक मार्गिका बंद करून खड्डे भरण्याचे काम सुरु असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे. याच वाहतूक कोंडीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुंबईच्या दिशेने जाणारा ताफा अडकला होता.  चंद्रशेखर बावनकुळे यांची गाडी वाहतूक कोंडीत अडकली असल्याचे समजताच वाहतूक पोलिसांनी सतर्कता दाखवत बाजूची वाहतूक थांबवून बावनकुळे यांची गाडी ज्या मार्गिकेत अडकली होती त्या मार्गिकेच्या गाड्या सोडणे सुरु केले. वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली. अशी माहिती एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली.